
बीड, 12 सप्टेंबर (हिं.स.)।
लिंबागणेश महसूल मंडळाच्या अंतर्गत पूर्वी असलेल्या मुळुकवाडी, मसेवाडी, सोमनाथवाडी, बेलगाव, पिंपरनई, पोखरी (घाट), फुकेवाडी यासह आठ गावांतील जुने महसुली रेकॉर्ड तहसील कार्यालयात जळाल्याने नमुना क्रमांक ३३ व ३४ मधील नोंदी उपलब्ध नसल्याचा मुद्दा यावेळी ऐरणीवर आला.
रेकॉर्डच उपलब्ध नसल्यास या गावांतील नागरिकांच्या कुणबी नोंदी शोधणार कशा, असा सवाल मराठासेवक डॉ. गणेश ढवळे, महारूद्र वाणी व मुळुकवाडीचे सरपंच रामकिसन कदम यांनी उपस्थित केला. संबंधित गावांतील जुन्या नोंदींचा पर्यायी स्रोत शोधून नागरिकांना पुरावे उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाने विशेष उपाययोजना कराव्यात, अशी मागणी त्यांनी तहसीलदार चंद्रकांत शेळके यांच्याकडे केली.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis