अमरावतीत पावसाने दिली पिकांना संजीवनी; दमदार सरींची प्रतीक्षा कायम
पर्जन्यमानाच्या सरासरीत ४१ टक्क्यांची तूट कायम अमरावती, 15 सप्टेंबर (हिं.स.)। ‘एल निनो’च्या प्रभावाने कमजोर पडलेल्या पावसाची यंदा तूट मोठी असताना व ऑगस्ट महिना जवळपास कोरडाच गेल्यानंतर शनिवार व रविवारी पावसाने पुनरागमन केले. सार्वत्रिक झालेल्या या
सहा मंडळांत अतिवृष्टी, पर्जन्यमानाच्या सरासरीत ४१ टक्क्यांची तूट


पर्जन्यमानाच्या सरासरीत ४१ टक्क्यांची तूट कायम

अमरावती, 15 सप्टेंबर (हिं.स.)। ‘एल निनो’च्या प्रभावाने कमजोर पडलेल्या पावसाची यंदा तूट मोठी असताना व ऑगस्ट महिना जवळपास कोरडाच गेल्यानंतर शनिवार व रविवारी पावसाने पुनरागमन केले. सार्वत्रिक झालेल्या या पावसाने मोड येत असलेल्या पिकांना थोडी संजीवनी मिळणार असली तरी पिकांच्या पुरेशा वाढीसाठी आणखी दमदार पावसाची प्रतीक्षा कायमच आहे.

सलग दोन दिवस झालेल्या पावसाने दिलासा देत पर्जन्यमानाची सरासरी ६९ टक्क्यांवर पोहोचविली आहे. ऑगस्ट महिन्यातील प्रदीर्घ खंडानंतर पहिल्यांदा शनिवारी व रविवारी पावसाचे पुनरागमन होऊन सार्वत्रिक पावसाची नोंद झाली. यामध्ये जिल्ह्यात शनिवारी २४ तासांत सरासरी १९.८ मी. मी. तर रविवारी १२.१ मी. मी. पाऊस झाला आहे. सहा महसूल मंडळांत अतिवृष्टी नोंदविण्यात आली आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर या पावसाचे आगमन तहानलेल्या पिकांना तात्पुरता दिलासा देणारे आहे. जूनमध्ये मॉन्सूनचे आगमन विलंबाने झाले, त्या महिन्यातील तूट कायम असताना जुलैतील अखेरच्या सप्ताहात झालेल्या दमदार पावसाने पेरण्या आटोपल्यात. ऑगस्टमध्ये पिके वाढीच्या अवस्थेत असताना मात्र पावसाने दीर्घकाळ दडी मारली. तापमान वाढल्याने जमिनीतील ओलावा कमी होऊन पिके करपण्याच्या स्थितीत आली आहेत.

सोयाबीनच्या शेंगा भरण्याच्या अवस्थेत आहेत. पावसाची नितांत गरज असताना सप्टेंबरमधील पहिले दहा दिवस कोरडेच गेलेत. दरम्यान, शनिवार व रविवारी झालेल्या पावसाने आशा जागवल्या असल्या तरी पिकांच्या पक्वतेसाठी पावसाची तूट भरून निघणे गरजेचे आहे. १२८ हेक्टरमध्ये नुकसान जिल्हा महसूल प्रशासनाने दिलेल्या प्राथमिक अंदाजानुसार धारणी तालुक्यात १२८ हेक्टरमध्ये नुकसान झालेले आहे. यामध्ये २४ हेक्टरमधील सोयाबीन, १४ हेक्टरमधील कपाशी, नऊ हेक्टरमधील तूर, ७४ हेक्टरमधील मका, पाच हेक्टरमध्ये धान तर तीन हेक्टरमधील ज्वारी पिकाचे नुकसान झाले आहे. भातकुली येथे अंगावर भिंत कोसळल्याने दीपक स्वर्गे हे जखमी झाले.

धारणी तालुक्यात सर्वाधिक पाऊस धारणी तालुक्यात सर्वाधिक पाऊस झाला असून या तालुक्यातील धारणी (६५.२५ मी. मी.), धूळघाट (७५), सावलीखेडा (७४.२५) आणि साद्राबडी (६६.५०) या मंडळांमध्ये अतिवृष्टी नोंदविण्यात आली आहे. तर रविवारी अंजनगावसुर्जी तालुक्यातील भंडारज या महसूल मंडळात अतिवृष्टी झाल्याची नोंद आहे. वरुड तालुक्यातील बेनोडा (९७.५०) आणि राजुरा (८६) या दोन मंडळांत अतिवृष्टी झाली. जिल्ह्यात सार्वत्रिक पाऊस झाला असला तरी मोसमातील एकूण सरासरीच्या तुलनेत अद्याप ४१ टक्क्यांची तूट कायम आहे. १ जून ते १४ सप्टेंबर, या कालावधीत जिल्ह्यात ७८०.१ मी. मी. सरासरीच्या तुलनेत केवळ ४६५.४ मी. मी. पावसाची नोंद झाली. सरासरीने तो ५९.७ टक्के आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande