रत्नागिरीत वन्यजीव पशुपक्षी काव्य स्पर्धेचे आयोजन
रत्नागिरी, 15 सप्टेंबर (हिं.स.) । उपविभागीय वन विभाग आणि रेडिओ कोकणच्या संयुक्त विद्यमाने वन्यजीव काव्य स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. वन्यजीव सप्ताहाच्या निमित्ताने जनजागृती व्हावी, या उद्देशाने ही काव्यस्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. रत्नागिरी
पशुपक्षी काव्य स्पर्धा


रत्नागिरी, 15 सप्टेंबर (हिं.स.) । उपविभागीय वन विभाग आणि रेडिओ कोकणच्या संयुक्त विद्यमाने वन्यजीव काव्य स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

वन्यजीव सप्ताहाच्या निमित्ताने जनजागृती व्हावी, या उद्देशाने ही काव्यस्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. रत्नागिरी जिल्हास्तरीय वन्यजीव काव्यस्पर्धा ही तीन गटांत होणार आहे. कविता पाठवण्यासाठी २१ सप्टेंबर २०२६ ही शेवटची तारीख आहे.

स्पर्धेचे तीन गट असे - गट अ - सातवी ते नववी, गट ब - दहावी ते बारावी, गट क - खुला गट (सर्वांसाठी)

स्पर्धेकरिता मराठी, कोकणी, बाणकोटी भाषेतील कविता पाठविता येतील. कवितेच्या ८ ते २० ओळी असाव्या. एक व्यक्ती एकच कविता पाठवू शकेल. कविता स्वरचित असावी.

स्पर्धेची बक्षिसे अशी - विद्यार्थी दोन्ही गट : प्रथम : रु. २०००, द्वितीय: रु. १०००, तृतीय : रु. ५००, याशिवाय प्रोत्साहनपर प्रत्येकी २५० रुपयांची दोन बक्षिसे आणि विजेत्या सर्वांना सन्मानपत्र दिले जाईल. पाच उत्तेजनार्थ विजेत्यांना रोपाची भेट आणि सन्मानपत्र दिले जाईल.

खुल्या गटासाठी अनुक्रमे ३०००, २००० आणि १००० रुपयांची बक्षिसे, प्रोत्साहनपर दोघांना प्रत्येकी ५०० रुपयांची बक्षिसे, सर्व विजेत्यांना सन्मानपत्र तसेच पाच उत्तेजनार्थ विजेत्यांनाह रोपे भेट तसेच सन्मानपत्र दिले जाईल.

कविता प्रत्यक्ष किंवा ऑनलाइन पद्धतीने वन विभागाला पाठवता येईल.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande