छ. संभाजीनगर : सफाई कामगारांच्या ३२ कुटुंबांना मिळाले हक्काचे घर
श्रमसाफल्य आवास योजनेअंतर्गत हर्सूलमध्ये १ बीएचके सदनिकांचे मोफत वाटप छत्रपती संभाजीनगर, १६ सप्टेंबर (हिं.स.) : छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या वतीने शहर स्वच्छ ठेवण्यासाठी वर्षानुवर्षे सेवा देणाऱ्या सफाई कामगारांच्या ३२ कुटुंबांना हक्काचे घर मिळा
अ


श्रमसाफल्य आवास योजनेअंतर्गत हर्सूलमध्ये १ बीएचके सदनिकांचे मोफत वाटप

छत्रपती संभाजीनगर, १६ सप्टेंबर (हिं.स.) : छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या वतीने शहर स्वच्छ ठेवण्यासाठी वर्षानुवर्षे सेवा देणाऱ्या सफाई कामगारांच्या ३२ कुटुंबांना हक्काचे घर मिळाले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य आवास योजनेअंतर्गत हर्सूल परिसरात उभारण्यात आलेल्या सुसज्ज १ बीएचके सदनिकांचे मोफत मालकी हक्काने वाटप करण्यात आले.

प्रत्येक सदनिकेचे क्षेत्रफळ ३० चौरस मीटर आहे. शहराच्या स्वच्छतेची जबाबदारी सातत्याने पार पाडणाऱ्या सफाई कामगारांच्या कुटुंबांना स्वतःच्या घराचा आधार मिळाल्याने त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला.

महापालिकेच्या या उपक्रमामुळे सफाई कामगारांच्या निवाऱ्याचा प्रश्न मार्गी लागला असून, त्यांच्या सामाजिक व आर्थिक स्थैर्याला हातभार लागणार आहे. अनेक वर्षांपासून शहर स्वच्छतेसाठी महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या या कुटुंबांना हक्काचे घर मिळाल्याने त्यांच्या जीवनात स्थैर्याची नवी सुरुवात झाली आहे.

----------------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande