
छत्रपती संभाजीनगर, 16 सप्टेंबर (हिं.स.)। मराठवाड्यात यंदा पावसाने मोठा खंड दिल्याने दुष्काळाची चाहूल लागली आहे. १५ सप्टेंबरपर्यंत विभागातील ४९६ पैकी २७८ मंडळांमध्ये ५० टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झाला असून त्याचा फटका तब्बल ५,५६० गावांना बसला आहे. विभागात आतापर्यंत अपेक्षित पावसाच्या तुलनेत ३१ टक्के तूट आहे. बीड, जालना आणि छत्रपती संभाजीनगर जिल्हे सर्वाधिक प्रभावित असून काही भागांत ४२ दिवसांहून अधिक काळ पावसाचा खंड आहे. मोठ्या धरणांमध्ये ६६ टक्के पाणीसाठा असला तरी काही प्रकल्पांची स्थिती चिंताजनक आहे. सध्या १४१ गावे-वाड्यांना १७१ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. प्रशासनाने अनधिकृत पाणीउपसा रोखून पाणी पिण्यासाठी आरक्षित ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis