शासकीय योजनांचा शेतकरी, विद्यार्थ्यांसाठी ‘लोकसंवाद-2026’ विशेष जनजागृती अभियान उत्साहात
नंदुरबार, 18 सप्टेंबर (हिं.स.) शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजना व उपक्रमांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवून पात्र लाभार्थ्यांना त्यांचा लाभ घेण्यासाठी मार्गदर्शन करण्याच्या उद्देशाने माहिती व जनसंपर्क विभागाच्या वतीने ‘लोकसंवाद-2026’ या विशेष
शासकीय योजनांचा शेतकरी, विद्यार्थ्यांसाठी ‘लोकसंवाद-2026’ विशेष जनजागृती अभियान उत्साहात


नंदुरबार, 18 सप्टेंबर (हिं.स.) शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजना व उपक्रमांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवून पात्र

लाभार्थ्यांना त्यांचा लाभ घेण्यासाठी मार्गदर्शन करण्याच्या उद्देशाने माहिती व जनसंपर्क विभागाच्या वतीने

‘लोकसंवाद-2026’ या विशेष जनजागृती अभियानाचे दापूर, ता. नवापूर येथे आयोजन करण्यात आला.

शेतकरी, विद्यार्थी आणि नागरिकांनी पात्रतेनुसार शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन

यावेळी करण्यात आले.

लोकसंवाद-2026’ तसेच सेवा संकल्प अभियानांतर्गत अनुदानित आदर्श प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा,

दापूर येथे आयोजित या कार्यक्रमास सरपंच जयराम कुवर, एकात्मिक आदिवासी विकास विभागाचे शिक्षण

विस्तार अधिकारी प्रकाश वसावे, उप कृषी अधिकारी राहुल शिरसाट, आश्रमशाळेचे मुख्याध्यापक

(माध्यमिक), मुख्याध्यापक (प्राथमिक) शरद खैरनार, नरसिंह वाघ, कृषी सहायक धनश्री गावित, माजी सरपंच

जर्मनदादा वळवी यांच्यासह ग्रामस्थ, शेतकरी, विद्यार्थी व नागरिक उपस्थित होते.

शिक्षण विस्तार अधिकारी प्रकाश वसावे यांनी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाच्या शिक्षण विभागामार्फत

राबविण्यात येणाऱ्या विविध शैक्षणिक योजनांची माहिती दिली. आश्रमशाळा समूह योजना, अनुसूचित

जमातीच्या विद्यार्थ्यांना नामांकित इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये प्रवेश योजना, वसतिगृह योजना, पंडित

दीनदयाल उपाध्याय योजना तसेच बारावीनंतर उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीच्या शिष्यवृत्ती योजनांची

माहिती त्यांनी दिली. पात्र विद्यार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रांसह संबंधित योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन

करण्यात आले.

उप कृषी अधिकारी राहुल शिरसाट यांनी कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती

दिली. यामध्ये फळबाग लागवड योजना, महाडीबीटीअंतर्गत कृषी योजना, कृषी यांत्रिकीकरण योजना,

प्रधानमंत्री कृषी सूक्ष्म सिंचन योजना, स्व. बाळासाहेब ठाकरे शेतकरी अपघात विमा योजना तसेच ॲग्रीस्टॅक

नोंदणी याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.

सरपंच जयराम कुवर यांनी माहिती व जनसंपर्क विभागाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या ‘लोकसंवाद’ या

विशेष जनजागृती उपक्रमाचे कौतुक केले. शासनाच्या योजना व उपक्रमांची माहिती थेट नागरिकांपर्यंत

पोहोचविण्यासाठी नागरिकांशी संवाद साधून राबविण्यात येणारा हा उपक्रम उपयुक्त असल्याचे त्यांनी

सांगितले. पर्यावरण संवर्धनासाठी नागरिकांनी फळबाग लागवडीसह मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड करावी,

असे आवाहनही त्यांनी केले.

शासनाच्या योजनांची माहिती थेट नागरिकांपर्यंत पोहोचल्यामुळे पात्र लाभार्थ्यांना योजनांचा लाभ घेणे सुलभ

होत आहे. त्यामुळे नागरिक व विद्यार्थ्यांनी आपल्या पात्रतेनुसार विविध शासकीय योजनांची माहिती घेऊन

त्यांचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande