गणपती उत्सवादरम्यान टपाल विभागामार्फत  विशेष गणपती रात्र शिबिरांचे आयोजन
जळगाव, 18 सप्टेंबर (हिं.स.) गणपती उत्सवादरम्यान नागरिकांना टपाल, आर्थिक आणि विमा सेवांची विस्तृत श्रेणी सोयीस्करपणे उपलब्ध करून देण्यासाठी टपाल विभागामार्फत विशेष गणपती रात्र शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे. या शिबिरांमध्ये स्पीड पोस्ट, नोंदणीकृत
गणपती उत्सवादरम्यान टपाल विभागामार्फत  विशेष गणपती रात्र शिबिरांचे आयोजन


जळगाव, 18 सप्टेंबर (हिं.स.) गणपती उत्सवादरम्यान नागरिकांना टपाल, आर्थिक आणि विमा सेवांची विस्तृत श्रेणी सोयीस्करपणे उपलब्ध करून देण्यासाठी टपाल विभागामार्फत विशेष गणपती रात्र शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे. या शिबिरांमध्ये स्पीड पोस्ट, नोंदणीकृत टपाल, देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय पार्सल सेवा, पोस्टल लाईफ इन्शुरन्स (PLI), ग्रामीण पोस्टल लाईफ इन्शुरन्स (RPLI), पोस्ट ऑफिस सेव्हिंग्स बँक (POSB) तसेच नागरिक-केंद्रित सेवांची माहिती व सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. सहभागी केंद्रांवर आधारसंबंधित सेवाही उपलब्ध आहेत.

गणपती रात्र शिबिरांमध्ये नागरिकांना टपाल अधिकारी यांच्याशी संवाद साधून टपाल, बचत, विमा, पार्सल व इतर सेवांबाबत मार्गदर्शन घेता येणार आहे. जळगाव जिल्ह्यात राजे संभाजी मित्र मंडळ, अमळनेर येथे शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. १९ सप्टेंबर रोजी बहेरपुरा युवा प्रतिष्ठान मंडळ, पाचोरा, अष्टविनायक गणेश मंडळ, पाचोरा तसेच जळगाव येथील प्रभात चौक गणेश मंडळ येथे शिबिर आयोजित करण्यात येणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande