
परभणी, 19 सप्टेंबर (हिं.स.)। रसिकराज ॲड. वसंतराव पाटील यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दरवर्षी आयोजित करण्यात येणाऱ्या संगीत सभेचे यंदाचे आयोजन २० सप्टेंबर रोजी सायंकाळी ६.३० वाजता श्री शिवाजी महाविद्यालय सभागृह, वसमत रोड, परभणी येथे करण्यात आले आहे.
यंदाच्या संगीत सभेचे मानकरी कोल्हापूरचे अर्णव बुवा (गायन) हे असून, त्यांना तबल्यावर प्रशांत गाजरे तर संवादिनीवर मंगेश जवळेकर साथसंगत करणार आहेत. अर्णव बुवा हे ज्येष्ठ गायक पं. व्यंकटेश कुमार यांचे शिष्योत्तम असून, अखिल भारतीय स्तरावरील विविध संगीत मैफिलींमधून त्यांनी आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे.
अभिजात संगीताची समृद्ध परंपरा रसिकांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने आयोजित या सांगीतिक मैफिलीचा परभणीतील संगीतप्रेमींनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. ॲड. वसंतराव पाटील कला मंच आणि अभिव्यक्ती कट्टा, परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने होणाऱ्या या कार्यक्रमास विनामूल्य प्रवेश असून, रसिकांनी उपस्थित रहावे असे आव्हान आयोजकांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis