पंढरपूरच्या वाहतूक व्यवस्थेला मिळणार गती; ९ रस्ते आणि २ पुलांच्या कामांना मंजुरी
सोलापूर, 19 सप्टेंबर (हिं.स.)। राज्यातील प्रमुख तीर्थक्षेत्र असलेल्या पंढरपुरात भाविकांसह वाहनांची संख्या वाढत असल्याने शहरातील वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी राज्य सरकारने तीर्थक्षेत्र विकास आराखड्याअंतर्गत विविध कामांना प्रशासकीय मंजुरी दि
Pandharparo news today


सोलापूर, 19 सप्टेंबर (हिं.स.)। राज्यातील प्रमुख तीर्थक्षेत्र असलेल्या पंढरपुरात भाविकांसह वाहनांची संख्या वाढत असल्याने शहरातील वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी राज्य सरकारने तीर्थक्षेत्र विकास आराखड्याअंतर्गत विविध कामांना प्रशासकीय मंजुरी दिली आहे.

नऊ रस्त्यांचे रुंदीकरण व सुधारणा तसेच दोन नवीन पुलांच्या कामांसाठी सुमारे ४९३ कोटी ६६ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या सर्व कामांची टेंडर प्रक्रिया सुरू झाली आहे.चंद्रभागा नदीवर जुन्या दगडी पुलाजवळ आणि मुंढेवाडी येथे दोन नवीन पूल उभारण्यात येणार आहेत. या पुलांमुळे नदीपैलतीरावरील पंढरपूरच्या विस्ताराला चालना मिळण्याबरोबरच शहरातील वाहतुकीचा ताण कमी होण्यास मदत होणार आहे.तीर्थक्षेत्र विकास आराखड्यात कॉरिडॉरच्या कामांसोबतच रस्ते विकासालाही प्राधान्य देण्यात आले आहे. पंढरपूर शहराभोवती प्रस्तावित रिंग रोडला जोडण्यासाठी विविध ‘कनेक्टिंग रोड्स’ तयार करण्यात येणार आहेत. ही कामे चालू वर्षाच्या बजेट बुकलेटमध्ये समाविष्ट असून त्यांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.

प्रस्तावित क्षेत्रनिहाय विस्ताराचा आराखडा NH-965 (पुणे-पंढरपूर), NH-561A आणि विविध राज्य महामार्गांना जोडणारा आहे. त्यामुळे आंतरजिल्हा प्रवास अधिक सुलभ होण्याबरोबरच वाखरी, पाखलपूर, गोपाळपूर, टाकळी आणि कासेगाव या परिसरांना परस्परांशी जोडण्यास मदत होणार आहे.रस्ते रुंदीकरण, नवीन पूल आणि कनेक्टिंग रोड्समुळे पंढरपूरच्या वाढत्या वाहतुकीचे नियोजन करण्यास मदत होणार असून शहराच्या पायाभूत सुविधांच्या विस्तारालाही चालना मिळणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande