मराठवाडा मुक्ती संग्रामदिनी बीडच्या विकासाला नवी गती; १७ सप्टेंबरला रेल्वेची पुण्याशी तर डिसेंबरमध्ये मुंबईशी जोडणी
बीड, 02 सप्टेंबर (हिं.स.)। कालबद्ध आराखडा तयार करून युद्ध पातळीवर काम करण्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या सूचना बीड जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाड्याच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणारी ''बीड–पुणे'' रेल्वे येत्या १७
अ


बीड, 02 सप्टेंबर (हिं.स.)।

कालबद्ध आराखडा तयार करून युद्ध पातळीवर काम करण्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या सूचना

बीड जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाड्याच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणारी 'बीड–पुणे' रेल्वे येत्या १७ सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या मुहूर्तावर धावणार असून, त्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व तांत्रिक व सुरक्षाविषयक चाचण्या पूर्ण करण्यात आल्या आहेत. तसेच डिसेंबरअखेर बीड–मुंबई (पनवेल) रेल्वे सेवा सुरू करण्याच्या दृष्टीने आवश्यक सर्व कामे युद्ध पातळीवर पूर्ण करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी दिल्या.

सह्याद्री अतिथीगृह येथे 'अहिल्यानगर–बीड–परळी' रेल्वे मार्गाच्या प्रगतीचा आढावा तसेच 'बीड–पुणे' आणि 'बीड–मुंबई' रेल्वे सेवा सुरू करण्यासंदर्भात उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस उपमुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ. राजेश देशमुख, दूरदृश्य प्रणालीद्वारे छत्रपती संभाजीनगरचे विभागीय आयुक्त जी. श्रीकांत, पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, बीडचे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन, मध्य रेल्वेचे मुख्य अभियंता (निर्माण) बी. के. सिंह,

अतिरिक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापक पद्मसिंह जाधव, वरिष्ठ विभागीय अभियंता व्ही. पी. पैठणकर, सीसीएम डॉ. सुमंत देऊळकर, विल्यम केरी यांच्यासह रेल्वे व प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande