रायगड : साखर गावात शिवसेना-युवासेना शाखेचे उद्घाटन
शासकीय योजना तळागाळापर्यंत पोहोचविण्याचा संकल्प रायगड, 20 सप्टेंबर (हिं.स.) : कामथे–गोवेले विभागातील सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या सोडविण्यासह शासकीय योजना तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने साखर गाव येथे शिवसेना-युवासेना शाखेच
Government schemes to be taken to every household: Yuva Sena branch launched at Sakhar.


शासकीय योजना तळागाळापर्यंत पोहोचविण्याचा संकल्प

रायगड, 20 सप्टेंबर (हिं.स.) : कामथे–गोवेले विभागातील सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या सोडविण्यासह शासकीय योजना तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने साखर गाव येथे शिवसेना-युवासेना शाखेची स्थापना करण्यात आली. युवासेना पदाधिकारी स्वप्नील सीताराम चोरगे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या शाखेचे उद्घाटन युवासेना कोअर कमिटी सदस्य विकासशेठ गोगावले यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले.

यावेळी उपस्थितांना संबोधित करताना विकासशेठ गोगावले म्हणाले, “या शाखेच्या माध्यमातून केवळ राजकारण न करता जनतेची जास्तीत जास्त सेवा करण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न राहील. नागरिकांच्या दैनंदिन समस्यांचे तातडीने निवारण करण्यासाठी आम्ही सदैव तत्पर आहोत.”

गोरगरीब जनतेच्या न्याय्य हक्कांसाठी पालकमंत्री भरतशेठ गोगावले यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना सदैव पाठीशी उभी असून, कोणत्याही प्रकारच्या मदतीसाठी नागरिकांनी थेट शाखेशी संपर्क साधावा, असे आवाहनही त्यांनी केले.

नवीन शाखेमुळे परिसरातील युवक आणि ग्रामस्थांना विविध शासकीय योजनांची थेट माहिती मिळण्यास तसेच शासकीय कामकाज सुलभ होण्यास मदत होणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

उद्घाटन सोहळ्यास रायगड जिल्हा परिषदेचे सदस्य डॉ. निलेश कुंभार, शिवसेना तालुका प्रमुख निलेश अहिरे, विभाग प्रमुख लक्ष्मण मोरे, नगरसेवक सिद्धेश शेठ, युवासेना तालुका प्रमुख विक्रम भिलारे, माजी सभापती शैलेश सलागरे, निलेश कंक, विकास नलावडे, दीपक दशरथ उतेकर यांच्यासह स्थानिक पदाधिकारी, शिवसैनिक, युवासेना कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या समारोपानंतर उपस्थितांनी नवनिर्वाचित शाखेच्या आगामी जनसेवा कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

---------------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)


 rajesh pande