पुणे महापालिकेच्या समित्यांच्या बैठकांमध्ये चहावर ३.२० लाखांचा खर्च
पुणे, 20 सप्टेंबर (हिं.स.)। पुणे महापालिकेतील विविध विषय समित्यांच्या बैठकीसाठी चहा आणि अन्य खाद्यपदार्थ पुरविण्यावर आतापर्यंत ३ लाख २० हजार रुपयांचा खर्च झाल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे, या खर्चासाठी निविदा प्रक्रिया न राबविताच बिले मंज
pmc


पुणे, 20 सप्टेंबर (हिं.स.)। पुणे महापालिकेतील विविध विषय समित्यांच्या बैठकीसाठी चहा आणि अन्य खाद्यपदार्थ पुरविण्यावर आतापर्यंत ३ लाख २० हजार रुपयांचा खर्च झाल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे, या खर्चासाठी निविदा प्रक्रिया न राबविताच बिले मंजूर करण्यात आल्याचे माहिती अधिकारातून समोर आले आहे.

माहिती अधिकार फोरमचे सदस्य उमेश नाईक यांनी माहिती अधिकार कायद्यान्वये याबाबतची माहिती मागविली होती. नगरसचिव विभागाने दिलेल्या माहितीतून समितीनिहाय चहाच्या खर्चाचा तपशील समोर आला आहे.यामध्ये सर्वाधिक खर्च स्थायी समितीच्या बैठकीत झाला आहे. स्थायी समितीच्या बैठकीतील चहा आणि खाद्यपदार्थांसाठी तब्बल २ लाख ७० हजार १४० रुपये खर्च झाल्याची माहिती आहे.त्यानंतर नाम समितीच्या बैठकीसाठी १५ हजार ७१६ रुपये, विधी समितीसाठी १४ हजार १३४ रुपये, शहर सुधारणा समितीसाठी १० हजार २४८ रुपये, तर महिला व बाल कल्याण समितीच्या बैठकीसाठी ८ हजार ७८८ रुपये खर्च झाल्याचे नमूद करण्यात आले आहे.दरम्यान, क्रीडा समितीच्या बैठकीतील चहाचा खर्च केवळ ४२० रुपये इतका असल्याचेही माहिती अधिकारातून स्पष्ट झाले आहे.समित्यांच्या बैठकीतील चहा व अन्य खाद्यपदार्थांच्या खर्चासाठी निविदा प्रक्रिया न राबविता बिले मंजूर करण्यात आल्याने महापालिकेच्या खर्चपद्धतीबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande