प्रभाकर बंडगर यांची लातूर ग्रामीण जिल्हा काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती
लातूर, 20 सप्टेंबर (हिं.स.)। शिरूर अनंतपाळ तालुक्याला संघटनात्मक जबाबदारी लातूर ग्रामीण जिल्हा काँग्रेस कमिटीची नूतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून शिरूर अनंतपाळ तालुक्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ पदाधिकारी तथा शिक्षक नेते प्रभाकर बंडगर यांची जिल
निवड


लातूर, 20 सप्टेंबर (हिं.स.)।

शिरूर अनंतपाळ तालुक्याला संघटनात्मक जबाबदारी

लातूर ग्रामीण जिल्हा काँग्रेस कमिटीची नूतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून शिरूर अनंतपाळ तालुक्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ पदाधिकारी तथा शिक्षक नेते प्रभाकर बंडगर यांची जिल्हा काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या मान्यतेने ही नियुक्ती करण्यात आली आहे.

प्रभाकर बंडगर यांनी यापूर्वी शिरूर अनंतपाळ तालुका काँग्रेसचे तालुकाध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळली आहे. शिक्षकांच्या तसेच सामाजिक व संघटनात्मक प्रश्नांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग राहिला आहे. नियुक्तीनंतर बंडगर यांनी काँग्रेसचे विधिमंडळ मुख्य प्रतोद तथा माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांची भेट घेऊन शुभेच्छा व मार्गदर्शन घेतले. यावेळी त्यांचा सत्कारही करण्यात आला.

शिरूर अनंतपाळ तालुक्यातील अनुभवी नेतृत्वाला जिल्हास्तरावर

मिळालेली ही जबाबदारी म्हणून बंडगर यांच्या नियुक्तीकडे काँग्रेस कार्यकर्त्यांकडून पाहिले जात असून त्यांच्या निवडीबद्दल तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अभिनंदन केले आहे.

या प्रसंगी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अभय साळुंके, शिक्षक नेते जे.जी. सगरे, काँग्रेस नेते डॉ. अरविंद भातांब्रे, आबासाहेब पाटील उजेडकर, चक्रधर शेळके, भिमाशंकर बोळेगावे आदी नेते व पदाधिकारी उपस्थित होते. नव्या कार्यकारिणीत प्रभाकर बंडगर यांची उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली असून संघटनात्मक बांधणीला प्राधान्य देण्यात आल्याचे जिल्हा काँग्रेसकडून सांगण्यात आले आहे

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande