
मुंबई, २३ सप्टेंबर (हिं.स.) : महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड ॲग्रीकल्चरच्या 'पर्यटन दिन' विशेषांकाचे राज्याचे पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते मंगळवारी मुंबईत प्रकाशन करण्यात आले.
जागतिक पर्यटन दिनाचे औचित्य साधून प्रकाशित करण्यात आलेल्या या विशेषांकामध्ये महाराष्ट्रातील पर्यटन क्षेत्राचा विकास, उद्योग-व्यवसायातील संधी तसेच कृषी-पर्यटनाच्या माध्यमातून ग्रामीण अर्थव्यवस्थेला मिळणारी चालना यांसह विविध विषयांवर प्रकाश टाकण्यात आला आहे.
यावेळी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड अँग्रीकल्चरचे अध्यक्ष श्री.रविन्द्र माणगावे, ट्रस्ट बोर्ड चेअरमन श्री. आशिष पेडणेकर, व्हिजन, स्टेटजी व मीडिया कमिटी चेअरमन श्री. शिवाजी मानकर, ऑरबिटेशन कमिटी चेअरमन अँड.राहुल हिंगमिरे उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी