किनवट एसटी आगारातून गहाळ झालेले टायर जमा; पोलिसांत तक्रार दाखल
नांदेड, 23 सप्टेंबर (हिं.स.)। किनवट एसटी आगारातून गहाळ झालेले चार नवीन टायर अखेर आगारापासून काही अंतरावर आढळून आले. आगारातील २ JK 1000×20 आणि २ CEAT 900×20 असे एकूण चार नवीन टायर गहाळ असल्याचे निदर्शनास आले होते. यानंतर आगार प्रशासनाने सदर टायरच
किनवट एसटी आगारातून गहाळ झालेले टायर जमा; पोलिसांत तक्रार दाखल


नांदेड, 23 सप्टेंबर (हिं.स.)।

किनवट एसटी आगारातून गहाळ झालेले चार नवीन टायर अखेर आगारापासून काही अंतरावर आढळून आले. आगारातील २ JK 1000×20 आणि २ CEAT 900×20 असे एकूण चार नवीन टायर गहाळ असल्याचे निदर्शनास आले होते. यानंतर आगार प्रशासनाने सदर टायरचा शोध घेण्यासाठी आगार परिसरात तपासणी केली. तसेच उपलब्ध नोंदी व सेन्सेक्स तपासण्यात आले. तपासणीत हे टायर आगारातील कोणत्याही बसवर बसविण्यात आलेले नसल्याचे स्पष्ट झाले. दरम्यान, आयप्पा मंदिर परिसरातील वॉटर प्लांटकडे जाणाऱ्या गल्लीमध्ये एका भिंतीलगत चार टायर ठेवलेले असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर आगार व्यवस्थापक, सहाय्यक आगार व्यवस्थापक आणि टायर फिटर यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. तपासणीदरम्यान आढळून आलेले टायर क्रमांक एसटी महामंडळाच्या टायरशी जुळत असल्याचे निदर्शनास आले.

त्यानंतर सदर चारही टायरचा पंचनामा करून ते अधिकृतपणे किनवट आगारात परत जमा करण्यात आले आहेत. मात्र, आगारातील नवीन टायर बाहेर कसे गेले आणि ते आयप्पा मंदिर परिसरातील गल्लीत कोणाच्या माध्यमातून ठेवण्यात आले, याबाबत अद्याप स्पष्टता झालेली नाही. या प्रकरणाची चौकशी व्हावी आणि घटनेमागील नेमके कारण समोर यावे यासाठी किनवट पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्यामुळे पोलिस तपासानंतर या प्रकरणातील पुढील बाबी स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande