व्यवसायातील जिद्दीमुळे माजलगावातील जगताप कुटुंब यशस्वी!
बीड, 24 सप्टेंबर (हिं.स.)। माजलगाव येथील जगताप ॲग्रो सर्व्हिसेस या फर्मचे नवीन जागेत स्थलांतर व शुभारंभ सोहळ्यास आमदार प्रकाश सोळंके यांची उपस्थिती होती. रामनाथ जगताप यांनी B.Sc. ॲग्रीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर सन २००९ मध्ये या व्यवसायाची सुरुवात
अ


बीड, 24 सप्टेंबर (हिं.स.)।

माजलगाव येथील जगताप ॲग्रो सर्व्हिसेस या फर्मचे नवीन जागेत स्थलांतर व शुभारंभ सोहळ्यास आमदार प्रकाश सोळंके यांची उपस्थिती होती. रामनाथ जगताप यांनी B.Sc. ॲग्रीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर सन २००९ मध्ये या व्यवसायाची सुरुवात केली. शेतकऱ्यांच्या पिकांची प्रत्यक्ष पाहणी करून त्यांच्या गरजेनुसार नामांकित कंपन्यांची औषधे व कृषी निविष्ठांबाबत मार्गदर्शन करण्याची त्यांनी सुरू केलेली कार्यपद्धती आज या व्यवसायाच्या यशस्वी वाटचालीचा आधार ठरली आहे.शेतकऱ्यांच्या पिकांचे उत्पादन वाढावे, त्यांच्या अडचणींवर योग्य मार्गदर्शन मिळावे आणि शेती अधिक उत्पादनक्षम व्हावी, या उद्देशाने जगताप कुटुंबाने सातत्याने केलेले काम निश्चितच कौतुकास्पद आहे.

------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande