अमरावती - गुरुकुंज मोझरीत अतिक्रमण कारवाईला विरोध; पुण्यतिथी महोत्सवापूर्वी दुकानदार आक्रमक
अमरावती, 26 सप्टेंबर, (हिं.स.)। राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या आगामी पुण्यतिथी महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गुरुकुंज मोझरी येथील स्थानिक दुकानदारांच्या अतिक्रमणावर कारवाई करण्याच्या हालचालींना विरोध सुरू झाला आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व प
गुरुकुंज मोझरीत अतिक्रमण कारवाईला विरोध; पुण्यतिथी महोत्सवापूर्वी दुकानदार आक्रमक


अमरावती, 26 सप्टेंबर, (हिं.स.)।

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या आगामी पुण्यतिथी महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गुरुकुंज मोझरी येथील स्थानिक दुकानदारांच्या अतिक्रमणावर कारवाई करण्याच्या हालचालींना विरोध सुरू झाला आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व प्रशासनाकडून पूर्वसूचना न देता कारवाई केली जात असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते प्रशांत कांबळे व स्थानिक दुकानदारांनी केला आहे.चहा, नाश्ता, पानसेंटर, झुणका-भाकर केंद्र आदी व्यवसाय करणाऱ्या स्थानिक तरुणांनी महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कर्ज काढून दुकानांमध्ये माल भरला आहे. त्यामुळे ऐन महोत्सवाच्या काळात कारवाई झाल्यास त्यांच्या रोजगारावर परिणाम होईल, अशी भूमिका दुकानदारांनी मांडली. महामार्ग बायपास झाल्याने व्यवसाय आधीच मंदावला असून, पुण्यतिथी महोत्सवातील भाविकांच्या गर्दीमुळे वर्षातील काही काळ रोजगाराची संधी मिळते, असेही त्यांनी सांगितले.प्रशांत कांबळे यांच्या पुढाकाराने दुकानदारांनी माजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांची भेट घेऊन निवेदन दिले. ठाकूर यांनी जिल्हाधिकारी, एनएचएआय व पोलीस प्रशासनाशी चर्चा करून पुण्यतिथी महोत्सव होईपर्यंत कारवाई करू नये, अशी मागणी केली.प्रशासनाने कारवाईचा निर्णय कायम ठेवल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दुकानदारांनी दिला आहे. यावेळी शेकडो स्थानिक व्यावसायिक उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande