लातूर - लोखंड लाईन परिसरात आगीचा कहर! धुराचे प्रचंड लोट आकाशात
लातूर, 28 सप्टेंबर (हिं.स.)। लातूरच्या स्क्रॅप मार्केट, लोखंड लाईन परिसरात भीषण आग लागल्याने एकच खळबळ उडाली आहे. आगीमुळे परिसरात धुराचे प्रचंड लोट पसरले असून, दूरवरूनही काळ्या धुराचे ढग स्पष्ट दिसत आहेत. प्राथमिक माहितीनुसार दुकाने जळून खाक झाल्य
भीषण आग


लातूर, 28 सप्टेंबर (हिं.स.)।

लातूरच्या स्क्रॅप मार्केट, लोखंड लाईन परिसरात भीषण आग लागल्याने एकच खळबळ उडाली आहे. आगीमुळे परिसरात धुराचे प्रचंड लोट पसरले असून, दूरवरूनही काळ्या धुराचे ढग स्पष्ट दिसत आहेत. प्राथमिक माहितीनुसार दुकाने जळून खाक झाल्याचे समोर येत आहे. आगीचे लोळ आणि धुराचे लोट तब्बल १० ते २० किलोमीटर परिसरातून दिसत असल्याची माहिती आहे.

लातूर महानगरपालिका अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले असून आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.

आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. सुदैवाने जीवितहानीबाबतची अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande