
छत्रपती संभाजीनगर, 03 सप्टेंबर (हिं.स.)।
पावसाने दिलेल्या खंडामुळे वाळून चाललेल्या सोयाबीन पिकांची सलगरा दिवटी व गंधोरा ता.तुळजापूर येथे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी पाहणी केली.
मराठवाड्यात मागील दीड महिन्यापासून पावसाने मोठा खंड दिल्यामुळे अनेक भागांतील सोयाबीन पिके पाण्याअभावी वाळून गेली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले असून, बळीराजा अडचणीत सापडला आहे.
सलगरा दिवटी व गंधोरा ता.तुळजापूर येथे शेतकऱ्यांच्या सोयाबीन पिकांची प्रत्यक्ष पाहणी करून नुकसानीची परिस्थिती जाणून घेतली.
शेतकऱ्यांचे नुकसान गंभीर असून, नुकसानग्रस्त पिकांचे तातडीने पंचनामे करून शासनाच्या नियमानुसार शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्यासाठी प्रशासनाला तातडीने पंचनामे करण्याचे निर्देश दिले.
शेतकऱ्यांच्या अडचणीच्या काळात त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून, त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आवश्यक तो पाठपुरावा केला जाईल.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis