
छत्रपती संभाजीनगर, 04 सप्टेंबर (हिं.स.)। सिल्लोड येथील आमदार अब्दुल सत्तार यांच्या जनसंपर्क कार्यालय शिवसेना भवन येथे आमदार सत्तर यांच्या अध्यक्षतेखाली सिल्लोड तालुका व शहर गणेश महासंघाच्या नूतन कार्यकारिणीच्या निवडीसंदर्भात महत्वपूर्ण बैठक पार पडली.या बैठकीत गणेशोत्सव अधिक उत्साहपूर्ण, शिस्तबद्ध आणि सामाजिक बांधिलकी जपत साजरा करण्याच्या उद्देशाने महासंघाच्या नूतन कार्यकारिणीची सर्वानुमते निवड करण्यात आली.
अध्यक्ष : केशवराव पा. तायडे
स्वागताध्यक्ष : अब्दुल समीर अ. सत्तार
कार्याध्यक्ष : नंदकिशोर सहारे
सचिव : सुधाकर पाटील, सुदर्शन अग्रवाल, मनोज झंवर
उपाध्यक्ष : किशोर अग्रवाल, अक्षय मगर
महासचिव : प्रशांत क्षीरसागर, सतीश ताठे, दुर्गेश जैस्वाल
कोषाध्यक्ष : विशाल जाधव, गणेश सयाजी वाघ, संजय फरकाडे, गणेश ढोरमारे
तसेच इतर पदाधिकारी, समितीप्रमुख व सदस्यांचीही निवड करण्यात आली. नवनिर्वाचित अध्यक्षांसह सर्व पदाधिकारी व सदस्यांचा सत्कार करून त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी शासनाच्या नियम व निकषांचे पालन करून गणेशोत्सव उत्साहात व शांततेत साजरा करावा, तसेच गणेशोत्सवाच्या माध्यमातून सामाजिक, व जनहिताचे उपक्रम मोठ्या प्रमाणात राबवावेत, अशा सूचना नवनिर्वाचित पदाधिकारी व सदस्यांना दिल्या.
गणेशोत्सव हा केवळ उत्सव न राहता सामाजिक एकोपा, संस्कृती आणि सेवाभावाचा उत्सव व्हावा, यासाठी गणेश महासंघाच्या माध्यमातून एकजुटीने काम करूया असे आवाहन त्यांनी केले
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis