परभणीत डिजिटल अरेस्टला आळा घालण्यासाठी पोलिसांच्या उपाययोजना
परभणी, 05 सप्टेंबर (हिं.स.)। नागरिकांना सायबर आर्थिक फसवणूक, ऑनलाईन बँकिंग फसवणूक, बनावट कागदपत्रांचा वापर तसेच विविध डिजिटल माध्यमांतून होणाऱ्या आर्थिक फसवणूकीपासून संरक्षण देण्यासाठी परभणी जिल्हा पोलीस आणि जिल्ह्यातील विविध बँकांच्या अधिकाऱ्यांच
डिजिटल अरेस्टला आळा घालण्यासाठी पोलिसांच्या उपाययोजना  -जिल्हा पोलीस व बँक समन्वय बैठक


परभणी, 05 सप्टेंबर (हिं.स.)।

नागरिकांना सायबर आर्थिक फसवणूक, ऑनलाईन बँकिंग फसवणूक, बनावट कागदपत्रांचा वापर तसेच विविध डिजिटल माध्यमांतून होणाऱ्या आर्थिक फसवणूकीपासून संरक्षण देण्यासाठी परभणी जिल्हा पोलीस आणि जिल्ह्यातील विविध बँकांच्या अधिकाऱ्यांची समन्वय बैठक येथील पोलीस अधीक्षक कार्यालयात आयोजित करण्यात आली.

या बैठकीत पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांनी बँक अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. सायबर आर्थिक फसवणुकीच्या प्रकरणांमध्ये वेळेत प्रतिसाद रक्कम सुरक्षित करणे, संपूर्ण मनी ट्रेल शोधणे आणि डिजिटल पुरावे सुरक्षित ठेवणे या बाबींचे सविस्तर विवेचन करण्यात आले. तसेच बैठकीत नवीन बँक खाते उघडताना केवायसी प्रक्रिया अधिक काटेकोर राबविणे, ग्राहकांची ओळख व कागदपत्रांची पडताळणी करणे, संशयास्पद व्यवहारांवर देखरेख, सायबर गुन्ह्यात वापरले जाणारी म्युल खाती रोखण्यासाठी बँकांनी दक्षता घेण्याचे आवाहन करण्यात आले. सायबर आर्थिक फसवणुकीच्या तक्रारीसाठी १९३० आणि सीएफसीएफआरएमएसद्वारे प्राप्त होणाऱ्या विनंतीवर तात्काळ कारवाई करून उपलब्ध रक्कम पुढे हस्तांतरण अथवा पाठविणे होण्यापूर्वी लागू प्रक्रियेवर लीन, होल्ड, फ्रिजबाबत आवश्यक कारवाई करण्याचे बँकांना निर्देशक देण्यात आले.

एटीएम व डिजिटल फसवणुकीचा प्रकरणात एटीएम, सीसीटीव्ही, इलेक्ट्रॉनिक व्यवहार, यूपीआय आयडी, ट्रांजेक्शन, रेफरन्स नंबर, रिमीटर, बेनिफिशियरी बँक आणि उपलब्ध डिजिटल पुरावे तात्काळ जतन करून पोलिसांना उपलब्ध करून देण्याचे बँकांना सुचित करण्यात आले. ग्राहकांमध्ये सायबर सुरक्षा विषयक जनजागृती वाढविण्यासाठी ओटीपी, यूपीआय पिन, एटीएम पिन, पासवर्ड कोणालाही न देणे, अनोखी लिंकवर क्लिक न करणे, रिमोट ऍक्सेस अँप इन्स्टॉल न करणे तसेच आर्थिक फसवणूक झाल्यास विलंब न करता १०३० वर संपर्क साधणे याबाबत जनजागृती करण्याच्याही सूचना देण्यात आल्या. या बैठकीस परभणी जिल्ह्यातील सर्व राष्ट्रीयकृत बँक, सहकारी पतसंस्था आणि खाजगी बँक यांचे जिल्हा समन्वयक हजर होते. जिल्हा अग्रणी बँकेचे एलडीएम रामचंद्र अकुलवार यांनी यासाठी पुढाकार घेतला.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande