जळगावात शिक्षक दिन उत्साहात
जळगाव, 05 सप्टेंबर (हिं.स.)गोदावरी फाऊंडेशन संचलित डॉ. वर्षा पाटील कॉलेज ऑफ कॉम्प्युटर अॅप्लिकेशनमध्ये शिक्षक दिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रति
जळगावात शिक्षक दिन उत्साहात


जळगाव, 05 सप्टेंबर (हिं.स.)गोदावरी फाऊंडेशन संचलित डॉ. वर्षा पाटील कॉलेज ऑफ कॉम्प्युटर अॅप्लिकेशनमध्ये शिक्षक दिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेस माल्यार्पण व पूजन करून करण्यात आली.याप्रसंगी बोलताना प्रा. लीना पाटील यांनी डॉ. राधाकृष्णन यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकत विद्यार्थ्यांच्या जडणघडणीतील शिक्षकांचे स्थान व नैतिक मूल्यांचे महत्त्व विशद केले.

महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. नीलिमा वारके यांनी संबोधित करताना सांगितले की, शिक्षक हे जीवनातील ज्ञानाचे दीपस्तंभ असतात. आई-वडिलांनंतर योग्य मार्ग दाखवणारे, गुणांना वाव देणारे आणि विचारांना योग्य दिशा देऊन भविष्य घडवणारे कार्य शिक्षकच करतात.कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन व आयोजन प्रा. शिवानी महाजन यांनी केले.स्थानिक गोदावरी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (आयएमआर) मध्ये शिक्षक दिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करून करण्यात आली.यावेळी प्रा. लीना पाटील यांनी डॉ. राधाकृष्णन यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकत विद्यार्थ्यांच्या जडणघडणीतील शिक्षकांचे महत्त्व आणि आधुनिक युगात नैतिक मूल्ये जपण्याचे आवाहन केले.

संस्थेचे संचालक डॉ. प्रशांत वारके यांनी संबोधित करताना सांगितले की, शिक्षक हा समाज घडवणारा मुख्य घटक असून विद्यार्थ्यांनी पुस्तकी ज्ञानासोबतच व्यावहारिक कौशल्ये व उत्तम संस्कार आत्मसात करून आदर्श नागरिक बनावे.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande