
नांदेड, 06 सप्टेंबर (हिं.स.)। शिवसेना आमदार आनंद बोंढारकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालय, नांदेड येथे पार पडलेल्या महावितरण नांदेड जिल्हा विद्युत समितीच्या बैठकीस उपस्थित राहून मतदारसंघातील विविध वीजविषयक अडीअडचणी व समस्यांवर सविस्तर चर्चा केली.
क्षेत्रातील प्रलंबित वीज जोडण्या, ट्रान्सफॉर्मरच्या समस्या, सुरळीत वीजपुरवठा तसेच नागरिकांच्या इतर वीजविषयक तक्रारींबाबत महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत सकारात्मक चर्चा झाली. या समस्या लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले. तसेच, आगामी सणासुदीच्या काळात नागरिकांना सुरळीत व अखंडित वीजपुरवठा मिळावा आणि वारंवार वीजपुरवठा खंडित होणार नाही, याची विशेष काळजी घ्यावी, असेही अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश दिले.
यावेळी महावितरण जिल्हा विद्युत समितीचे अध्यक्ष खा.अशोक चव्हाण, सहअध्यक्ष खा.डॉ.अजित गोपछडे, खा.नागेश पाटील आष्टीकर,खा.रवींद्र चव्हाण,आ.प्रतापराव पाटील चिखलीकर,आ.बालाजीराव कल्याणकर,आ.श्रीजया चव्हाण,आ.जितेंद्र अंतापूरकर यांच्यासह महावितरणचे वरिष्ठ अधिकारी व संबंधित पदाधिकारी उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis