छ. संभाजीनगरमध्ये एमआयएमच्या २९ पदाधिकाऱ्यांची नवीन कार्यकारिणी जाहीर
छत्रपती संभाजीनगर, 06 सप्टेंबर (हिं.स.)। एमआयएमच्या छत्रपती संभाजीनगर मध्य शहर संघटनेची नवीन कार्यकारिणी हज हाऊसच्या सभागृहात जाहीर करण्यात आली. शहराध्यक्ष नासेर सिद्दीकी यांनी २९ पदाधिकाऱ्यांच्या नवीन टीमची घोषणा केली. प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील
Q


छत्रपती संभाजीनगर, 06 सप्टेंबर (हिं.स.)। एमआयएमच्या छत्रपती संभाजीनगर मध्य शहर संघटनेची नवीन कार्यकारिणी हज हाऊसच्या सभागृहात जाहीर करण्यात आली. शहराध्यक्ष नासेर सिद्दीकी यांनी २९ पदाधिकाऱ्यांच्या नवीन टीमची घोषणा केली. प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांच्या हस्ते नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला.

छत्रपती संभाजीनगर मध्य शहराध्यक्षपदी युवा नेते जिशान मुकीम देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली असून, कार्याध्यक्षपदाची जबाबदारी मुसेफ कुरेशी यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासह नागरिकांचे प्रश्न सोडविण्यावर नवीन कार्यकारिणी भर देणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. कार्यक्रमाला प्रदेश पदाधिकारी प्रभाकर पारधे, जिल्हाध्यक्ष शारेक नक्शबंदी, विरोधी पक्षनेते समीर साजिद बिल्डर, गटनेते हाजी शेरखान, युवा जिल्हाध्यक्ष इद्रीस नवाब यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande