पांढरी गावामध्ये तब्बल २० ते २५ वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर अखेर एसटी बस धावली!
बीड, 07 सप्टेंबर (हिं.स.) गेल्या दोन दशकांपासून प्रलंबित असलेला एसटी बसचा प्रश्न आदरणीय श्री. रणवीर काका पंडित यांच्या विशेष प्रयत्नातून आणि सहकार्यातून अखेर मार्गी लागला आहे. आज पांढरी गावात एसटी बसचे आगमन होताच गावकऱ्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आ
अ


बीड, 07 सप्टेंबर (हिं.स.) गेल्या दोन दशकांपासून प्रलंबित असलेला एसटी बसचा प्रश्न आदरणीय श्री. रणवीर काका पंडित यांच्या विशेष प्रयत्नातून आणि सहकार्यातून अखेर मार्गी लागला आहे. आज पांढरी गावात एसटी बसचे आगमन होताच गावकऱ्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद आणि उत्साह पाहायला मिळाला.

या ऐतिहासिक आणि कौतुकास्पद प्रसंगी पांढरी गावकऱ्यांच्या वतीने आदरणीय श्री. रणवीर काका पंडित तसेच माजी सभापती डॉ. आसारामजी मराठे साहेब यांचा विशेष नागरी सत्कार करण्यात आला. याचबरोबर, गावात पहिली बस घेऊन आलेल्या एसटीचे चालक व वाहक यांचाही गावकऱ्यांनी आवर्जून सत्कार करून त्यांचा सन्मान केला.गावाची वर्षानुवर्षांची वाहतुकीची अडचण दूर करून एसटी सेवा पूर्ववत सुरू करून दिल्याबद्दल श्री. रणवीर काका पंडित यांचे समस्त पांढरी ग्रामस्थांच्या वतीने मनापासून खूप खूप आभार

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande