मणिपुरी संगीतकार चोंगथम विक्रम सिंह यांच्या मृत्यूवर खरगे- राहुल गांधींकडून शोक ; दोषींवर कारवाईची मागणी
नवी दिल्ली, 08 सप्टेंबर (हिं.स.)। काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि पक्षाच्या मीडिया आणि प्रचार विभागाचे अध्यक्ष पवन खेडा यांनी दिल्लीत मणिपूरचे प्रख्यात संगीतकार चोंगथम विक्रम सिंह यांचा कथित मारहाणीनंतर
CONG MANIPUR MUSICIAN DEATH


नवी दिल्ली, 08 सप्टेंबर (हिं.स.)। काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि पक्षाच्या मीडिया आणि प्रचार विभागाचे अध्यक्ष पवन खेडा यांनी दिल्लीत मणिपूरचे प्रख्यात संगीतकार चोंगथम विक्रम सिंह यांचा कथित मारहाणीनंतर झालेल्या मृत्यूवर दुःख व्यक्त केले आहे. काँग्रेस नेत्यांनी या प्रकरणाची तातडीने चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

मल्लिकार्जुन खरगे यांनी मंगळवारी सोशल मीडिया मंच ‘एक्स’वर म्हटले की, जमावाकडून चोंगथम विक्रम सिंह यांची निर्घृण हत्या होणे ही भाजपच्या सत्तेतील कायदा आणि सुव्यवस्थेच्या परिस्थितीशी संबंधित आणखी एक गंभीर घटना आहे. त्यांनी म्हटले की, विद्यार्थी सुरक्षित नाहीत, महिलांवर अत्याचार होत आहेत आणि ईशान्येकडील लोकांसोबत भेदभावाच्या घटना समोर येत आहेत. खरगे यांनी दिल्लीतील गुन्हेगारीच्या परिस्थितीबाबत जबाबदारी निश्चित करण्याची मागणी करत शोकाकुल कुटुंबीयांप्रति संवेदना व्यक्त केली. तसेच पीडित कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे आणि दोषींवर कठोर कारवाई झाली पाहिजे, असे त्यांनी म्हटले.

विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी म्हटले की, चोंगथम विक्रम सिंह आपल्या घराबाहेर काही लोकांना आवाज कमी करण्यास सांगण्यासाठी गेले होते. मात्र, त्यांना मारहाण करून त्यांची हत्या करण्यात आली. या घटनेमुळे दिल्लीत राहणाऱ्या ईशान्येकडील कुटुंबांच्या सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत. राहुल गांधी यांनी या प्रकरणाची तातडीने चौकशी करून दोषींना न्यायाच्या कठड्यात उभे करण्याची मागणी केली.

पवन खेडा यांनी म्हटले की, प्रथमदर्शनी ही दारूच्या नशेत झालेल्या हिंसाचाराची वेगळी घटना वाटू शकते. मात्र, यामागे व्यापक सामाजिक आणि प्रशासकीय अपयशही दिसून येते. त्यांनी आरोप केला की, अनेक वर्षांपासून नियमांकडे दुर्लक्ष, सार्वजनिक अव्यवस्था आणि कायद्याची असमान अंमलबजावणी सामान्य झाली आहे. त्यामुळे शिक्षेपासून वाचून जाण्याची संस्कृती विकसित झाली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande