बंदरे प्रकल्पांना गती देऊन कालमर्यादेत कामे पूर्ण करा - नितेश राणे
मुंबई, 08 सप्टेंबर (हिं.स.)। राज्यातील बंदरे विभागामार्फत सुरू असलेल्या विविध प्रकल्पांचे सुयोग्य नियोजन करून कामांना गती द्यावी आणि सर्व प्रकल्प निर्धारित कालमर्यादेत पूर्ण करण्याची दक्षता घ्यावी, असे निर्देश मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश रा
Port Projects


मुंबई, 08 सप्टेंबर (हिं.स.)। राज्यातील बंदरे विभागामार्फत सुरू असलेल्या विविध प्रकल्पांचे सुयोग्य नियोजन करून कामांना गती द्यावी आणि सर्व प्रकल्प निर्धारित कालमर्यादेत पूर्ण करण्याची दक्षता घ्यावी, असे निर्देश मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी दिले.

मंत्रालयातील समिती कक्षात आयोजित बैठकीत मंत्री राणे यांनी विभागातील प्रकल्पांचा सविस्तर आढावा घेतला. बैठकीस बंदरे विभागाचे अपर मुख्य सचिव संजय सेठी, महाराष्ट्र सागरी मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप पी. यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

राज्यात बंदरांची निर्मिती व विकासाला मोठा वाव असून, या माध्यमातून रोजगारनिर्मिती तसेच गुंतवणुकीला चालना मिळणार आहे. त्यामुळे बंदर विकासाच्या क्षेत्रात कार्यरत असलेल्या अन्य राज्यांतील उद्योजकांशी अधिकाऱ्यांनी संवाद साधून राज्यात गुंतवणूक वाढविण्यासाठी आवश्यक प्रयत्न करावेत, असे निर्देश मंत्री राणे यांनी दिले.

बैठकीत मुंबई वॉटर मेट्रो प्रकल्पाच्या अंमलबजावणीचाही आढावा घेण्यात आला. हा प्रकल्प जलदगतीने पूर्ण करण्यासाठी आवश्यक कार्यवाही तातडीने करण्याचे निर्देश मंत्री राणे यांनी दिले. तसेच रेडिओ क्लब जेट्टीच्या सद्यस्थितीबाबतही चर्चा करून आवश्यक बाबींचा आढावा घेण्यात आला. तसेच योजना व सेवांच्या शासकीय प्रक्रियेची पुनर्रचना’ (जीपीआर) अंतर्गत विविध योजना व सेवांच्या प्रक्रियेत सुलभीकरण आणि गतिमानता आणण्याबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande