शिक्षणापलीकडचे ध्येय ठेवल्यास यश निश्चित : डॉ. रवींद्र सपकाळ
सपकाळ अभियांत्रिकी प्रथम वर्ष विद्यार्थी प्रवेश स्वागत सोहळा उत्साहात नाशिक, 08 सप्टेंबर (हिं.स.)। विद्यार्थ्यानी शिक्षण घेतांना आपण नवीन काय शिकणार आहोत याचा विचार करावा.अभ्यासाबरोबच विविध तंत्रज्ञान, कौशल्ये आत्मसात करून शिक्षणापलीकडचे ध्येय ठेव
Success is certain if you set


सपकाळ अभियांत्रिकी प्रथम वर्ष विद्यार्थी प्रवेश स्वागत सोहळा उत्साहात

नाशिक, 08 सप्टेंबर (हिं.स.)। विद्यार्थ्यानी शिक्षण घेतांना आपण नवीन काय शिकणार आहोत याचा विचार करावा.अभ्यासाबरोबच विविध तंत्रज्ञान, कौशल्ये आत्मसात करून शिक्षणापलीकडचे ध्येय ठेवल्यास यश निश्चित मिळेल यासाठी आपल्या शिक्षक तसेच पालकांशी योग्य समन्वय साधत नात्यांमध्ये पारदर्शकता आणा असे प्रतिपादन सपकाळ नॉलेज हबचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. रवींद्र सपकाळ यांनी लेट.जी.एन.सपकाळ कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग महाविद्यालयातर्फे २०२६-२०२७ या शैक्षणिक वर्षात प्रथम वर्ष आभियांत्रिकी शाखेत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या स्वागत सोहळ्यासाठी उपस्थित असलेल्या पालक आणि विद्यार्थ्यांशी संवाद साधतांना केले.

सपकाळ नॉलेज हबचे मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सपकाळ यांनी विद्यार्थ्याशी संवाद साधताना सांगितले की, विद्यार्थ्यानी कोणताही संकोच न बाळगता शिक्षकांशी संवाद साधायला हवा. आपली अंगभूत कौशल्ये विकसित करून ध्येयावर लक्ष्य केंद्रीत केल्यास यश निश्चित मिळेल असे मार्गदर्शन करून उपस्थितांना शुभेछा दिल्या. प्रेसिजन टेकनो लि.चे विभागप्रमुख श्री.नानासाहेब कोळगे यांची विशेष उपस्थिती या कार्यक्रमाला लाभली होती आपल्या मनोगतामध्ये त्यांनी पालकांशी व विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

दीपप्रज्वलन व सरस्वती पूजनाने या कार्यक्रमाची सुरुवात झाली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला विद्यार्थ्यांचे स्वागत करताना आभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. साहेबराव बागल यांनी प्रवेशित झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना समान संधी आहे निवडलेली शाखा कोणतीही असो आपले कौशल्य सिध्द करा तेच तुमचे करियर ठरविणार आहे असे मार्गदर्शन केले.

मागील वर्षी प्रथम वर्ष आभियांत्रिकी शाखेतून विशेष प्राविण्य मिळविलेल्या वैष्णवी आंधळे, पीयूष चौधरी, कुणाल पाटील, सानिया सातपुते आणि राजनांदिंनी वारे या गुणवंतांचा सपकाळ नॉलेज ह्बचे अध्यक्ष व संचालक डॉ. रवींद्र सपकाळ यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. संस्थेच्या उपाध्यक्षा सौ कल्याणी सपकाळ यांनी कार्यक्रमास शुभेछा दिल्या, प्रशासकीय अधिकारी डॉ. सचिन हारक, फार्मसीचे प्राचार्य डॉ.आर.एस.बच्छाव, प्राचार्या प्रा. दीप्ती फडतरे, डॉ. आरती मोरे, प्रथम वर्ष समन्वयक प्रा. संदीप बागुल, प्लेसमेंट ऑफिसर प्रा. अशोक मोरे , सर्व विभागप्रमुख तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आदी उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / MANAS CHANDRASHEKHAR GOSAVI


 rajesh pande