साेलापूर जिल्ह्यातील २० टक्के उसाचे चिपाड
सोलापूर, 10 ऑक्टोबर, (हिं.स.)। अतिवृष्टीसह महापुरामुळे जिल्ह्यात सीना अन भीमा नद्याकाठी शेतात आठवडाभर पाणी साचून राहिल्याने उसाचे चिपाड झाले आहे. त्यामुळे सुमारे १५ ते २० लाख टन उसाचे नुकसान झाल्याचा कारखानदारांचा अंदाज आहे. मागील वर्षी झालेल्या १०
sugar mill


सोलापूर, 10 ऑक्टोबर, (हिं.स.)। अतिवृष्टीसह महापुरामुळे जिल्ह्यात सीना अन भीमा नद्याकाठी शेतात आठवडाभर पाणी साचून राहिल्याने उसाचे चिपाड झाले आहे. त्यामुळे सुमारे १५ ते २० लाख टन उसाचे नुकसान झाल्याचा कारखानदारांचा अंदाज आहे. मागील वर्षी झालेल्या १०३.७४ लाख टन गाळपामध्ये यंदा साधारण २० टक्क्यांहून अधिक उसाचे चिपाड होण्याची शक्यता आहे. यंदा गाळप हंगाम चांगला चालेल, असा कारखानदारांचा अंदाज होता. मात्र, या नुकसानीमुळे सीनाकाठच्या उसावर अवलंबून असलेल्या १० हून अधिक कारखान्यांच्या गाळपावर परिणाम होणार आहे.

यंदा एक नोव्हेंबरपासून ऊस गाळप हंगामाला सुरुवात होणार आहे. गतवर्षी जिल्ह्यातील ३४ कारखान्यांपैकी काही साखर कारखान्यांचा गाळप हंगाम जानेवारीतच आटोपला. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा मुबलक ऊस उपलब्ध असल्याने गाळप हंगाम दीर्घकाळ चालेल, अशी स्थिती होती. कारण यंदा ८३ हजार हेक्टर ऊस क्षेत्र वाढले आहे. शिवाय दोन वर्षांपासून उजनी धरण पूर्ण क्षमतेने भरत असल्यामुळे व आधुनिक लागवड तंत्रज्ञानामुळे उत्पादनातही वाढ झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ३८ साखर कारखाने गाळपासाठी सज्ज झाले आहेत. मात्र, ऑगस्टमध्ये अतिवृष्टीने साडेतीन हजार हेक्टर उसाचे नुकसान झाले. तर सप्टेंबर महिन्यातील अतिवृष्टीसह सीना, भोगावती व बोरी या नद्यांना आलेल्या पुरामुळे नद्याकाठच्या उसाचे मोठे नुकसान झाले. विशेषतः सीनाकाठच्या ऊस शेतीला मोठा फटका बसला आहे. परिणामी या नद्याकाठच्या उसावर अवलंबून असलेल्या १० हून अधिक कारखान्यांच्या गाळपावर परिणाम होणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande