तालिबान सरकारच्या पत्रकार परिषदेत महिलांना बंदी फतव्यावर काँग्रेसने मागितले उत्तर
नवी दिल्ली, ११ ऑक्टोबर (हिं.स.) महिलांना देशाचा अभिमान म्हणत काँग्रेस नेत्यांनी अफगाणिस्तानातील तालिबान सरकारचे परराष्ट्र मंत्री अमीर खान मुत्ताकी यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत महिला पत्रकारांना उपस्थित राहण्यापासून बंदी घालण्याबाबत केंद्र
राहुल गांधी आणि प्रियांका गांधी


नवी दिल्ली, ११ ऑक्टोबर (हिं.स.) महिलांना देशाचा अभिमान म्हणत काँग्रेस नेत्यांनी अफगाणिस्तानातील तालिबान सरकारचे परराष्ट्र मंत्री अमीर खान मुत्ताकी यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत महिला पत्रकारांना उपस्थित राहण्यापासून बंदी घालण्याबाबत केंद्र सरकारकडून उत्तर मागितले. काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी वड्रा यांनी या घटनेला महिलांचा अपमान म्हटले आणि सरकारकडून उत्तर मागितले, तर लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या मौनावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत ते भेदभावपूर्ण असल्याचे म्हटले आहे.

प्रियांका गांधी यांनी एका एक्स-पोस्टमध्ये लिहिले की, तालिबान प्रतिनिधीच्या भारत भेटीदरम्यान झालेल्या पत्रकार परिषदेतून महिला पत्रकारांना का काढून टाकण्यात आले हे केंद्र सरकारने स्पष्ट करावे. जर महिला हक्कांप्रती सरकारची वचनबद्धता केवळ निवडणूक चाल नाही, तर देशातील काही सर्वात सक्षम महिलांचा अपमान कसा होऊ दिला गेला, जेव्हा महिला भारताचा कणा आणि समाजाचा अभिमान आहेत.

राहुल गांधी यांनी प्रियंका गांधी यांची पोस्ट पुन्हा पोस्ट करताना लिहिले की, जेव्हा महिला पत्रकारांना सार्वजनिक व्यासपीठांवरून वगळले जाते तेव्हा सरकार भारतातील प्रत्येक महिलेला त्यांच्या हक्कांचे रक्षण करण्यात कमकुवत असल्याचा संदेश देते. त्यांनी म्हटले की, महिलांना प्रत्येक क्षेत्रात समान सहभाग घेण्याचा अधिकार आहे आणि अशा भेदभावाविरुद्ध सरकारचे मौन महिला सक्षमीकरणाच्या घोषणांच्या पोकळपणाला उघड करते.

परराष्ट्र मंत्रालयाने या प्रकरणाचे स्पष्टीकरण देत म्हटले आहे की, अफगाणिस्तानच्या मंत्र्यांच्या पत्रकार परिषदेत भारत सरकारची कोणतीही भूमिका नव्हती. हा कार्यक्रम पूर्णपणे अफगाणिस्तानच्या बाजूने आयोजित करण्यात आला होता.

हे उल्लेखनीय आहे की, परराष्ट्र मंत्री मुत्ताकी ९ ते १६ ऑक्टोबर दरम्यान भारत दौऱ्यावर आहेत. १० ऑक्टोबर रोजी त्यांनी परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांची भेट घेतली. या बैठकीदरम्यान दोन्ही बाजूंनी परस्पर व्यापार, मानवतावादी मदत आणि प्रादेशिक सुरक्षा यासारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा केली. या बैठकीदरम्यान, शुक्रवारी महिला पत्रकारांना मुत्ताकी यांच्या पत्रकार परिषदेत सहभागी होण्यापासून रोखण्यात आले होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande