चेन्नई, 11 ऑक्टोबर (हिं.स.) : मदुरईहून चेन्नईला जाणाऱ्या इंडिगोच्या विमानाची विंडशील्ड (काच) लँडिंगपूर्वीच तुटली. पायलटने वेळेवर ही गोष्ट लक्षात घेतली आणि एअर ट्रॅफिक कंट्रोलरच्या (एटीसी) मदतीने 76 प्रवाशांसह विमानाचे चेन्नईत सुरक्षित लँडिंग केले. यामुळे मोठा अपघात टळला. सर्व प्रवासी सुरक्षित असून कोणालाही दुखापत झाली नाही. विंडशील्ड का तुटली, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. अपघातानंतर विमानाची परतीचे (मदुरईकडे) उड्डाण रद्द करण्यात आले आहे.
यासंदर्भातील माहितीनुसार इंडिगो एअरलाईन्सचे हे विमान शनिवारी सकाळी मदुरई विमानतळावरून चेन्नईसाठी निघाले होते. लँडिंगच्या काही वेळ आधीच पायलटच्या लक्षात आले की विमानाची समोरील काच (विंडशील्ड) तुटली आहे. त्याने तातडीने याची माहिती एअर ट्रॅफिक कंट्रोलरला दिली. माहिती मिळताच एटीसीने तात्काळ कारवाई करत आवश्यक सर्व मदत केली आणि विमानाला सुरक्षितरित्या लँडिंग करण्यास मदत केली. विमान सुरक्षितपणे जमिनीवर उतरल्यावर प्रवाशांनी सुटकेचा श्वास घेतला. सर्व प्रवाशांना सुखरूपपणे खाली उतरवण्यात आले आणि विमानाची विंडशील्ड बदली गेली. मात्र, विंडशील्ड नेमकी कशामुळे तुटली, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. या घटनेनंतर विमानाची परतीची (चेन्नईहून मदुराई) फ्लाइट रद्द करण्यात आली आहे.
----------------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी