छत्रपती संभाजीनगर, 12 ऑक्टोबर (हिं.स.)शिवसेना शिंदे पक्षाच्या छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर समन्वयक समितीची जाहीर करण्यात आली आहे.छत्रपती संभाजी नगर जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाठ यांनी यासंदर्भात सांगितले की, हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आनंद यांच्या आशीर्वादाने व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर समन्वयक समितीची जाहीर करण्यात आली आहे.
या समितीच्या माध्यमातून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये बाळासाहेबांचे विचार घेऊन जीवाच रान करत भगवा फडकावण्यासाठी मेहनत करतील व निश्चितच भगवा फडकावल्या शिवाय मागे हटणार नाही असा विश्वास आहे. एकनाथ शिंदे यांनी आमच्यावर टाकलेला विश्वासाबद्दल मंत्री संजय शिरसाट यांनी मनःपूर्वक आभार व्यक्त केले आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis