वसई विकास सहकारी बँकेला बेस्ट अर्बन को-ऑपरेटिव्ह शेड्युल्ड बँक पुरस्कार
पालघर, 12 ऑक्टोबर (हिं.स.)।वसई तालुक्यातील सहकार क्षेत्रातील अग्रगण्य बँक असलेल्या वसई विकास सहकारी बँकेला प्रतिष्ठित एफसीबीए (FCBA) बँकींग फ्रंटिअर पुरस्कार २०२५ सोहळयात बेस्ट अर्बन को-ऑपरेटिव्ह शेडयुल्ड बँक, बेस्ट सायबर सेक्यूरेटी ट्रॉन्सफॉरमेशन
वसई विकास सहकारी बँकेला  बेस्ट अर्बन को-ऑपरेटिव्ह शेडयुल्ड बँक पुरस्कार


पालघर, 12 ऑक्टोबर (हिं.स.)।वसई तालुक्यातील सहकार क्षेत्रातील अग्रगण्य बँक असलेल्या वसई विकास सहकारी बँकेला प्रतिष्ठित एफसीबीए (FCBA) बँकींग फ्रंटिअर पुरस्कार २०२५ सोहळयात बेस्ट अर्बन को-ऑपरेटिव्ह शेडयुल्ड बँक, बेस्ट सायबर सेक्यूरेटी ट्रॉन्सफॉरमेशन आणि बेस्ट SOC ट्रॉन्सफॉरमेशन या तीन पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.

गोवा येथे झालेल्या समारंभात गोवा राज्याचे सहकार मंत्री सुभाष शिरोडकर यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात आले.वसई विकास सहकारी बँकेचे चेअरमन आशय राऊत यांनी पुरस्कार स्विकारल्यावर त्यावर बोलताना सांगितले की, हा पुरस्कार सहकारी बँकिंग क्षेत्रातील उत्कृष्टता, नाविन्यपूर्णता, ग्राहकांचा विश्वास आणि मजबूत सायबर सुरक्षा पध्दतीबद्दलच्या आपल्या अथक वचनबध्दतेचा पुरावा आहे तसेच असे पुरस्कार तंत्रज्ञानासह परंपरेचे मिश्रण करुन सहकारी बँकिंग मजबूत करण्याचा आमचा प्रवास सुरु ठेवण्यासाठी प्रेरणा देते त्यांनी निष्ठावंत ग्राहकांचे आणि कर्मचाऱ्यांचे मनापासून आभार मानले व आपल्या सर्व सभासद, ग्राहकांचा अढळ विश्वास आणि सर्व संचालक मंडळ व व्यवस्थापक मंडळाच्या संपूर्ण पाठिंब्यामुळेच हे शक्य झाले आहे असा त्यांनी आवर्जून उल्लेख केला. एकत्रितपणे आपण एक मजबूत सुरक्षित आणि प्रगतीशील वसई विकास सहकारी बँक तयार करीत आहोत असे शेवटी त्यांनी सांगितले. बँकेचे सी.ई.ओ. दिलीप ठाकूर यांनी पुरस्काराबद्दल बोलताना सांगितले कि, आमचे लक्ष डिजिटल नविन उपक्रम चालविण्यावर, सुरक्षित सायबर आणि ग्राहक केंद्रित बँकिंग सोल्युशन्स तयार करण्यावर राहिल जे वसई विकास सहकारी बँकेला भविष्यासाठी एक आदर्श सहकारी बँक बनवेल.

---------------

हिंदुस्थान समाचार / NAVIN NARESH PATIL


 rajesh pande