नवी दिल्ली, 12 ऑक्टोबर (हिं.स.)भारताची विमान वाहतूक नियामक संस्था नागरी विमान वाहतूक महासंचालनालयने एअर इंडियाच्या फ्लाइट AI ११७ मधील अनकमांडेड आरएटी (रॅम एअर टर्बाइन) उघडण्याच्या घटनेबाबत बोईंगकडून संपूर्ण अहवाल मागितला आहे. डीजीसीएने एअर इंडियाला सर्व प्रभावित विमानांवरील आरएटी स्टोरेज आणि अलीकडेच बदललेल्या पॉवर कंट्रोल मॉड्यूल (पीसीएम) ची तपासणी करण्याचा सल्ला दिला आहे.
डीजीसीएच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, बोईंगला संपूर्ण घटना चौकशी अहवाल, बोईंग ७८७ विमानांवरील अशाच घटनांवरील जागतिक डेटा आणि पीसीएम बदलीनंतर ऑपरेटर अहवाल, प्रतिबंधात्मक उपायांची माहिती सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
डीजीसीएने एअर इंडियाला त्यांच्या डीचेक वर्क पॅकेजचा आढावा घेण्यास आणि पीसीएम मॉड्यूल बदलण्याशी संबंधित सर्व आवश्यक काम योग्यरित्या पूर्ण झाले आहे याची खात्री करण्यास सांगितले आहे. पीसीएम मॉड्यूल बदललेल्या सर्व बोईंग ७८७ विमानांवर आरएटी स्टोरेजची पुन्हा तपासणी केली जाणार आहे.
घटनेची माहिती देताना अधिकाऱ्याने सांगितले की, एआय-११७, एक बोईंग ७८७-८ (व्हीटी-एएनओ) विमान अमृतसरहून बर्मिंगहॅमला उड्डाण करत होते. ५ ऑक्टोबर २०२५ रोजी, लँडिंग दरम्यान ४०० फूट उंचीवर आरएटी विनाकमांड तैनात करण्यात आले. पायलटने कोणतीही तक्रार केली नाही आणि विमान सुरक्षितपणे उतरले. बोईंगने सांगितले की, अनियोजित आरएटी तैनातीसाठी देखभालीची कारवाई करण्यात आली आणि कोणताही दोष आढळला नाही. विमानाला सेवेसाठी परवानगी देण्यात आली आणि ते दिल्लीला परत आले. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी डीजीसीए या घटनेची चौकशी करत आहे.
एफआयपीने म्हटले आहे की, या घटना एअर इंडियाच्या देखभाल आणि सुरक्षा मानकांमध्ये घसरण दर्शवितात. त्यांनी डीजीसीए आणि मंत्रालयाला सर्व एअर इंडिया बोईंग ७८७ विमानांच्या विद्युत प्रणालींची सखोल तपासणी करण्याची विनंती केली. सर्व सुरक्षा तपासणी पूर्ण होईपर्यंत बोईंग ७८७ विमाने ग्राउंडेड करावीत. एअर इंडियाच्या देखभालीच्या कामाचे विशेष डीजीसीए ऑडिट करावे. एअर इंडियाने AI-154 विमानात कोणत्याही विद्युत बिघाडाची माहिती नसल्याचे नाकारले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे