सेशेल्सच्या राष्ट्रपती निवडणुकीत पॅट्रिक हर्मिनी विजयी; पंतप्रधान मोदींनी दिल्या शुभेच्छा
नवी दिल्ली / विक्टोरिया, 12 ऑक्टोबर (हिं.स.)।सेशेल्सच्या राष्ट्रपती निवडणुकीत विरोधी पक्षनेते पॅट्रिक हर्मिनी यांनी ऐतिहासिक विजय मिळवला आहे.त्यांनी विद्यमान राष्ट्रपती वेवल रामकलावन यांचा अटीतटीच्या लढतीत पराभव करून सत्तेवर ताबा मिळवला. रविवारी (द
Patrick Hermini wins Seychelles presidential election


नवी दिल्ली / विक्टोरिया, 12 ऑक्टोबर (हिं.स.)।सेशेल्सच्या राष्ट्रपती निवडणुकीत विरोधी पक्षनेते पॅट्रिक हर्मिनी यांनी ऐतिहासिक विजय मिळवला आहे.त्यांनी विद्यमान राष्ट्रपती वेवल रामकलावन यांचा अटीतटीच्या लढतीत पराभव करून सत्तेवर ताबा मिळवला. रविवारी (दि.१२) पहाटे जाहीर झालेल्या अधिकृत निकालांनुसार, हर्मिनी यांना 52.7% मते मिळाली, तर रामकलावन यांना केवळ 47.3% मते मिळाली.राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत विजय मिळवल्याबद्दल भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पॅट्रिक हर्मिनी यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

पंतप्रधान मोदी यांनी ‘एक्स’ या प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट करत लिहिले, “सेशेल्सच्या राष्ट्रपती निवडणुकीत डॉ. पॅट्रिक हर्मिनी यांच्या विजयाबद्दल हार्दिक शुभेच्छा. हिंद महासागराचे पाणी ही आपली सामायिक वारसा आहे आणि आपल्या लोकांच्या अपेक्षा व गरजांचे पोषण करते. मला विश्वास आहे की राष्ट्रपती म्हणून त्यांच्या कार्यकाळात आपले दीर्घकालीन आणि बहुआयामी संबंध अधिक दृढ होतील आणि गती पकडतील. त्यांच्या आगामी कार्यकाळासाठी माझ्या शुभेच्छा.”

पॅट्रिक हर्मिनी युनायटेड सेशेल्स पार्टीचे नेतृत्व करतात, जी पार्टी 1977 ते 2020 या सुमारे चार दशकांच्या कालावधीत हिंद महासागरातील या लहान द्वीपीय देशावर सत्ता गाजवत होती. मात्र, 2020 मध्ये या पक्षाचा पराभव झाला होता. आता मात्र, पुन्हा एकदा त्यांनी सत्तेवर पुनरागमन केले आहे. रामकलावन हे सेशेल्वा डेमोक्रॅटिक युनियन पार्टीचे सदस्य आहेत आणि 2020 पासून राष्ट्रपती पदावर होते. ते दुसऱ्या कार्यकाळासाठी निवडून यायचे होते, पण जनतेने या वेळी परिवर्तनाला प्राधान्य दिले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande