सोलापूर जिल्ह्यात सातशे मुलांकडे अनाथ प्रमाणपत्र
सोलापूर, 12 ऑक्टोबर (हिं.स.)।ज्या मुलांचे आई-वडील दोघेही हयात नाहीत. अशा मुलांना शासनाच्या महिला व बालविकास विभागाकडून अनाथ प्रमाणपत्र देण्याची सोय केली आहे. 2018 पासून ते आजतागायत जिल्ह्यातील 700 मुलांनी महिला व बालविकास अधिकारी कार्यालयाकडे अनाथ
सोलापूर जिल्ह्यात सातशे मुलांकडे अनाथ प्रमाणपत्र


सोलापूर, 12 ऑक्टोबर (हिं.स.)।ज्या मुलांचे आई-वडील दोघेही हयात नाहीत. अशा मुलांना शासनाच्या महिला व बालविकास विभागाकडून अनाथ प्रमाणपत्र देण्याची सोय केली आहे. 2018 पासून ते आजतागायत जिल्ह्यातील 700 मुलांनी महिला व बालविकास अधिकारी कार्यालयाकडे अनाथ प्रमाणपत्र मिळवण्यासाठी अर्ज सादर केला असून या सर्वच अर्जदार मुलांना अनाथ प्रमाणपत्राचे वितरण केला आहे.सरकारच्या विविध विभागात नोकरी भरती करताना अनाथ मुलांना एक टक्केचे आरक्षण ठेवले आहे. वयाची 18 वर्षे पूर्ण होण्याच्या आत आई-वडील जर मरण पावले असतील तर अशा मयत दांपत्यांच्या मुलांना अनाथ प्रमाणपत्र मिळण्याची सोय आहे. 2018 मध्ये राज्य सरकारने हा कायदा लागू केला. संबंधित विभागाकडे अर्ज प्राप्त झाल्यानंतर अर्जदाराची स्थानिक चौकशी केली जाते. तो कुठे राहतो यासह अन्य नातेवाईक आहेत का. हेही पाहिले जाते. तसेच प्रस्तावासोबत सादर केलेले विविध प्रमाणपत्रे योग्य आहेत का, याची पडताळणी केली जाते. महिला व बालविकास अधिकारी हे बालकल्याण समितीच्या बैठकीतील शिफारसीनंतर हा प्रस्ताव पुणे येथील उपायुक्तांकडे पाठवला जातो. त्यानंतर प्रमाणपत्र वितरित केले जाते.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande