सोलापूर, 12 ऑक्टोबर (हिं.स.)।राज्य आशा-गटप्रवर्तक कर्मचारी कृती समितीच्या शिष्टमंडळाची राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर, आरोग्य सेवा आयुक्त तथा संचालक कादंबरी बलकवडे, सहसंचालक राजेंद्र भालेराव आणि राज्य समन्वयक स्वाती पाटील यांच्या सोबत झालेल्या बैठकीत विविध प्रलंबित मागण्यांवर चर्चा झाली.तसेच, गटप्रवर्तकांना कंत्राटी कर्मचाऱ्यांचा दर्जा देण्यासाठीचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठवून त्याचा पाठपुरावा केला जाईल, असेही त्यांनी नमूद केले.सेवानिवृत्तीचे वय 60 वरून 65 वर्षे करण्याबाबत मागील आदेश पुनर्विचारात घेण्यात येईल, असे आयुक्तांनी स्पष्ट केले. गटप्रवर्तकांसाठी एकसमान रंगाचा गणवेश देण्याबाबत चर्चा झाली. ऑनलाइन कामाबाबत सक्ती नाही असे स्पष्ट करण्यात आले आहे. थकीत मानधन त्वरित देण्यासाठी आणि ‘लाडकी बहरण’ योजनेंतर्गत नोंदणी केलेल्या आशांना मोबदला मिळवून देण्यासाठी पाठपुरावा केला जाईल. बायोमेट्रिक हजेरीची सक्ती रद्द करण्यात आली असून, प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर दररोज हजेरी लावण्याची जबाबदारी राहणार नाही, असा दिलासा कृती समितीला मिळाला.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड