पुणे, 12 ऑक्टोबर (हिं.स.)।नागरिकांना उत्तम आरोग्यसेवा मिळावी, यासाठी पुणे महापालिकेने कोट्यवधी रुपयांचा खर्च करून कमला नेहरू रुग्णालयात आधुनिक बाल अतिदक्षता विभाग (पेडियाट्रिक आयसीयू) उभारला आहे. मात्र, या विभागासाठी आवश्यक डॉक्टर उपलब्ध नसल्याचा खुलासा समोर आल्याने आश्चर्य आणि संताप व्यक्त केला जात आहे.या पार्श्वभूमीवर या विभागातील साधनसामग्री आणि डॉक्टरांची तातडीने सेवा तपासणी (ऑडिट) करावी, अशी मागणी स्थायी समितीच्या माजी अध्यक्षा अश्विनी कदम यांनी केली आहे.ससून रुग्णालयाच्या बालरोग विभागप्रमुखांनी कमला नेहरू रुग्णालयाला पत्र लिहून ‘महापालिकेच्या दवाखान्यांमध्ये डॉक्टर नोकरीसाठी उपलब्ध नाहीत,’ असा खुलासा केला आहे. या दाव्याला हास्यास्पद आणि दिशाभूल करणारे म्हणत कदम यांनी सांगितले की, महाराष्ट्रातील वैद्यकीय महाविद्यालयांतून दरवर्षी शेकडो डॉक्टर पदवीधर होतात.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु