पुरंदर विमानतळाच्या परिसरात लेआउट मंजुरी बंद
पुणे, 12 ऑक्टोबर (हिं.स.)। पुरंदर येथील विमानतळाच्या ९० टक्के जागेचे अधिग्रहण झालेले आहे. उर्वरित दहा टक्के जागाही लवकरच ताब्यात येईल. विमानतळाच्या परिसरात काही नागरिक जमिनीची खरेदी विक्री करण्यासाठी लेआउट पाडण्याचे काम करत आहेत.पण त्यास मंजूरी दिल
पुरंदर विमानतळाच्या परिसरात लेआउट मंजुरी बंद


पुणे, 12 ऑक्टोबर (हिं.स.)। पुरंदर येथील विमानतळाच्या ९० टक्के जागेचे अधिग्रहण झालेले आहे. उर्वरित दहा टक्के जागाही लवकरच ताब्यात येईल. विमानतळाच्या परिसरात काही नागरिक जमिनीची खरेदी विक्री करण्यासाठी लेआउट पाडण्याचे काम करत आहेत.पण त्यास मंजूरी दिली जाणार नसल्याने त्याचा खरेदीचा व्यवहार होणार नाही याची काळजी महसूल विभागाकडून घेतली जात आहे. नागरिकांनी असे व्यवहार टाळून फसवणूक पासून सावध राहावे, असे आवाहन राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.

पुण्यात संघटनात्मक बैठकीसाठी बावनकुळे आले असता त्याने पत्रकारांशी संवाद साधला. गेल्या अनेक वर्षापासून पुरंदरच्या विमानतळाबाबत चर्चा सुरू आहे. मात्र आता गेल्या काही महिन्यांपासून शेतकऱ्यांना योग्य मोबदला देऊन भूसंपादन करण्याच्या कामाला गती आलेली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande