पुणे महापालिकेच्या 90 शाळांमध्ये सीसीटीव्ही यंत्रणा बसविणार
पुणे, 12 ऑक्टोबर (हिं.स.)।महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा दृष्टीने खबरदारीचा उपाय म्हणून महापालिकेच्या सर्व 300 शाळांमध्ये सीसीटीव्ही बसविण्यात येत असून पहिल्या टप्प्यात सुमारे 91 शाळांमध्ये 862 सीसीटीव्ही बसविण्यात आले असून त्यान
पुणे महापालिकेच्या 90 शाळांमध्ये सीसीटीव्ही यंत्रणा बसविणार


पुणे, 12 ऑक्टोबर (हिं.स.)।महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा दृष्टीने खबरदारीचा उपाय म्हणून महापालिकेच्या सर्व 300 शाळांमध्ये सीसीटीव्ही बसविण्यात येत असून पहिल्या टप्प्यात सुमारे 91 शाळांमध्ये 862 सीसीटीव्ही बसविण्यात आले असून त्यानंतर आता दुसऱ्या टप्प्यात 90 शाळांमध्ये सीसीटीव्ही बसविण्यासाठी चार कोटी रुपयांच्या पूर्वगणक पत्रकाला मान्यता देण्यात आली आहे.बदलापूरमध्ये शाळेत विद्यार्थिनीवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणामुळे राज्यभर खळबळ उडाली होती. या घटनेची गंभीर दखल घेत शासनाने राज्यातील प्रत्येक शाळेत सीसीटीव्ही लावण्याचा आदेश दिला होता.

पुणे महापालिकेच्या शहराच्या जुन्या हद्दीसह समाविष्ट 32 गावांत मिळून सुमारे 300 शाळा आहेत.विद्युत विभाग आणि शिक्षण विभागाने एकत्रितपणे सर्व शाळांचे सर्वेक्षण केले. शाळेच्या इमारतीमध्ये किती खोल्या आहेत, किती मजले आहेत, मोकळी जागा, प्रवेशद्वार किती आहेत याची पाहणी केली. त्यानुसार या सर्व इमारतींमध्ये सीसीटीव्ही बसविण्याचा निर्णय घेण्यात आला होता. याच्या पहिल्या टप्प्यात 91 शाळांमध्ये 862 सीसीटीव्ही बसवण्यात आले असून आता आणखी 90 शाळांमध्ये 4 कोटी रुपये खर्च करून नव्याने सीसीटीव्ही बसवले जाणार आहे. यानंतर देखली 150 शाळांमध्ये सीसीटीव्ही बसविण्याचे काम बाकी राहणार असून तेथे देखील टप्प्या-टप्प्याने सीसीटीव्ही बसविले जाणार असल्याची माहिती, विद्युत विभागाच्या प्रमुख मनीषा शेकटकर यांनी दिली.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande