सोलापूर, 12 ऑक्टोबर (हिं.स.)।
मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागीय कार्यालयाच्या प्रशासनाने स्वच्छ रेलगाडी (स्वच्छ ट्रेन) या थीम अंतर्गत स्वच्छता पंधरवड्याचा भाग म्हणून गाड्या व देखभाल डेपोमध्ये स्वच्छतेसह आरोग्य मानके सुनिश्चित करण्यावर लक्ष केंद्रित केले.विध ठिकाणी वरिष्ठ विभाग अभियंते (एसएसई) आणि मुख्य आरोग्य निरीक्षक (सीएचआय) यांनी गाड्यांची कसून तपासणी केली. गाड्यांमध्ये हे समाविष्ट होते: ऑन-बोर्ड हाऊसकीपिंग सर्व्हिसेस (ओबीएचएस) चे सुरळीत कामकाज सुनिश्चित करण्यासाठी, स्वच्छता आणि देखभाल साहित्याची उपलब्धता देखील तपासण्यात आली. सेवेचा दर्जा सुधारण्यासाठी व प्रवाशांच्या तक्रारी कमी करण्यासाठी कर्मचाऱ्यांचे समुपदेशनही केले. शिवाय, डब्यांची स्वच्छता व कचरा टाकण्याविषयीचे सुचना पत्रकाची तपासणीही केली. जागरूकतेसाठी पोस्टर्स लावले.येथेे आधुनिक उपकरणे व यांत्रिक साधनांचा वापर करून ट्रेन पीट लाइनची स्वच्छता करण्यात आली. सिद्धेश्वर एक्सप्रेस, हसन एक्सप्रेस, हुतात्मा एक्सप्रेस व वंदे भारत एक्सप्रेस या सर्व डब्यांमध्ये स्वच्छता जागरूकता पोस्टर्सची उपलब्धता निश्चित केली. रेक गाड्यांची पुन्हा एकदा कसून तपासणी करण्यात आली.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड