लातूर -निलंगा तालुक्यातील शेतकरी महिलेच्या सोयाबीन पिकाला आग लावली
लातूर, 13 ऑक्टोबर (हिं.स.)निलंगा तालुक्यातील बोरसुरी येथील शेतकरी सुमनबाई बाबुराव सूर्यवंशी या शेतकरी महिलेच्या शेतातील सोयाबीनच्या बनीमाला (पिकाला ) अज्ञात समाजकंटकांनी आग लावण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. यामुळे या महिलेचे प्रचंड मोठे नुकसान झाले
अ


लातूर, 13 ऑक्टोबर (हिं.स.)निलंगा तालुक्यातील बोरसुरी येथील शेतकरी सुमनबाई बाबुराव सूर्यवंशी या शेतकरी महिलेच्या शेतातील सोयाबीनच्या बनीमाला (पिकाला ) अज्ञात समाजकंटकांनी आग लावण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. यामुळे या महिलेचे प्रचंड मोठे नुकसान झाले आहे

निलंगा तालुक्यातील बोरसुरी येथील शेतकरी सुमनबाई बाबुराव सूर्यवंशी या शेतकरी महिलेने कष्टाने पिकवलेलं सोयाबीन काढणी नंतर बनीम मारून ठेवले होते. अज्ञात व्यक्तींनी त्या सोयाबीनच्या बनीमस आग लावून दिले.स्थानिक शेतकरी व गावकरी यांच्या समवेत घटनास्थळी भेट देऊन झालेल्या नुकसानाची पाहणी केली. ही घटना मन सुन्न करणारी असून डोळ्यांत फक्त पाणीच पाणी उरलं आहे. बळीराजाने आयुष्यभर घाम गाळून उभं केलेलं पीक एका रात्रीत राख बनून उद्ध्वस्त झाले असून त्याच्या हातात आता फक्त राखेचा ढिग आणि अश्रृंनी धुसर झालेलं भविष्य आहे.

या वेळी औराद महसूल मंडळ निरीक्षक ॲड.संदीप मोरे पाटील, बालाजी सावरे, दत्तात्रय माने व शेतकरी बांधव उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande