सोलापूर, 13 ऑक्टोबर (हिं.स.)सोलापूर जिल्हा परिषदेच्या 68 जागांसाठी सदस्य पदाचे आरक्षण सोडत काढण्यात आली. यामध्ये अक्कलकोट तालुक्यातील पान मंगरूळ आणि जेऊर हे दोन जिल्हा परिषद गट अनुसूचित जातीसाठी राखीव झाल्याने त्या ठिकाणी माजी आमदार सिद्धाराम आप्पा पाटील आणि जिल्हा परिषदेचे माजी सभापती मल्लिकार्जुन पाटील यांना धक्का बसला.
ज्येष्ठ नेते बळीराम काका साठे यांना पुन्हा जिल्हा परिषदेमध्ये येण्याची इच्छा होती परंतु त्यांचा नान्नज गट ओबीसी सर्वसाधारण साठी राखीव झाला आहे. करमाळा तालुक्यात सहा जिल्हा परिषद गटापैकी पाच महिलांसाठी आरक्षित झाले आहेत. माजी सभापती विजयराव डोंगरे उमेश पाटील यांचे जिल्हा परिषद गट सर्वसाधारण झाल्याने ते पुन्हा जिल्हा परिषदेमध्ये दिसण्याची शक्यता आहे.
जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद महसूल उप जिल्हाधिकारी संतोष देशमुख यांच्या उपस्थितीमध्ये ही आरक्षणाचे सोडत काढण्यात आली. ही प्रक्रिया पार पाडण्यासाठी नायब तहसीलदार सुरेंद्र परदेशीमठ, अव्वल कारकून दीपक ठेंगील, मल्हारी नाईकनवरे, पुष्पवती साखरे, प्रताप काळे यांनी सहभाग घेतला.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड