नागपूर जिल्हा परिषद निवडणुकीसाठी आरक्षण सोडत जाहीर
नागपूर, 13 ऑक्टोबर (हिं.स.) : नागपूर जिल्हा परिषदेच्या आगामी निवडणुकीसाठी विभागनिहाय सदस्यांच्या आरक्षणाची सोडत आज जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या अध्यक्षतेखाली जाहीर करण्यात आली. ही प्रक्रिया जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली असून, यावेळी विवि
संग्रहित निवडणूक लोगो


नागपूर, 13 ऑक्टोबर (हिं.स.) : नागपूर जिल्हा परिषदेच्या आगामी निवडणुकीसाठी विभागनिहाय सदस्यांच्या आरक्षणाची सोडत आज जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या अध्यक्षतेखाली जाहीर करण्यात आली. ही प्रक्रिया जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली असून, यावेळी विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधीही उपस्थित होते.

जिल्ह्यातील एकूण 57 निवडणूक विभागांकरिता अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागासवर्ग आणि खुल्या प्रवर्गासाठी आरक्षण निश्चित करण्यात आले आहे. यामध्ये महिलांसाठीही स्वतंत्र आरक्षण ठेवण्यात आले आहे.

आरक्षणाचे तपशील :-

⦁ अनुसूचित जाती– 10 जागा (त्यापैकी 5 महिला)

⦁ अनुसूचित जमाती – 8 जागा (त्यापैकी 4 महिला)

⦁ नागरिकांचा मागासवर्ग – 15 जागा (त्यापैकी 8 महिला)

⦁ खुला प्रवर्ग – 24 जागा (त्यापैकी 12 महिला)

तालुकानिहाय आरक्षण यादी (मुख्य ठळक माहिती):

सावनेर तालुका: बडेगाव (सर्वसाधारण), वाघोडा (OBC), केळवद (OBC महिला), चनकापूर (SC), चिचोली (SC), वलनी (सर्वसाधारण महिला)

रामटेक तालुका: वडांबा (ST), बोथिया (ST), सोनेघाट (ST महिला), मनसर (ST महिला), नगरधन (OBC महिला)

कामठी तालुका: कोराडी (OBC महिला), भिलगाव (सर्वसाधारण महिला), वडोदा (सर्वसाधारण)

हिंगणा तालुका: रायपूर (सर्वसाधारण महिला), ईसासनी (SC महिला), टाकळघाट (SC महिला), सावंगी-देवळी (ST), कान्होलीबारा (ST महिला)

नरखेड तालुका: बेलोना, सावरगाव, जलालखेडा (सर्वसाधारण महिला), भिष्णुर (सर्वसाधारण)

उमरेड तालुका: मकरधोकडा (OBC), वायगाव (SC महिला), बेला (सर्वसाधारण), सिसी (OBC)

भिवापूर तालुका: तास, मालेवाडा (सर्वसाधारण महिला), नांद (ST)

(इतर तालुक्यांच्या जागांची यादीही यामध्ये समाविष्ट आहे.)

राजकीय हालचालींना गती

आरक्षण सोडतीनंतर विविध पक्षांनी रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. महिला आरक्षणामुळे महिला उमेदवारांना अधिक संधी उपलब्ध होणार असून, सामाजिक समावेशालाही चालना मिळणार आहे.

जिल्हाधिकारी डॉ. इटनकर यांनी सांगितले की, संपूर्ण प्रक्रिया पारदर्शकपणे पार पडली असून, नियमावलीनुसारच आरक्षण निश्चित करण्यात आले आहे.

----------------------

हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी


 rajesh pande