परभणी, 13 ऑक्टोबर (हिं.स.)।राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी अजय गव्हाणे यांची नियुक्ती राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदी अजय विजय गव्हाणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी सोमवारी (दि.13) मुंबई येथील प्रदेश कार्यालयात अजय गव्हाणे यांना प्रदेशाध्यक्ष शशीकांत शिंदे यांनी केलेल्या नियुक्तीचे पत्र प्रदान केले व आशिर्वाद दिला.
दरम्यान, यावेळी ज्येष्ठ नेते माजी आमदार अॅड. विजय गव्हाणे, माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी मंत्री अनिल देशमुख यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. दरम्यान, अजय गव्हाणे यांच्या या नियुक्तीचे पक्षीय ज्येष्ठ नेतेमंडळींसह अन्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जोरदार स्वागत केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis