अकोला, 13 ऑक्टोबर (हिं.स.) : गेल्या काही दिवसांपासून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा सर्वोपचार रुग्णालयातील विविध समस्यांनी व कारणाने वादग्रस्त ठरत असलेल्या विषयांना तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेना अकोल्याच्या पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या विविध निवेदनाचा जाब विचारण्यासाठी मनसेचे पदाधिकारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता ह्यांची भेट घेण्यासाठी कार्यालयात गेले असता त्यांनी भेट नाकारत उत्तर देण्यास टाळले.कार्यकर्त्यांच्या घोषणा चालू असतानाच अधिष्ठाता कार्यालयात गेले व सुरक्षा रक्षकांनी दार लावत मनसे पदाधिकाऱ्यांना बाहेरच रोखले.
मनसे पदाधिकाऱ्यांचे कार्यालयाच्या दारात ठिय्या आंदोलन!
अधिष्ठाता हे कार्यालयात आत गेल्यावर मनसे पदाधिकाऱ्यांनी तिथेच ठिय्या आंदोलन सुरू केले व घोषणाबाजी करत निवेदानातील मागण्याची पूर्तता करण्याची मागणी लावून धरली.ह्याच वेळी अधिष्ठाता मागच्या दारातून कार्यालयातून परस्पर निघून गेले.मनसे पदाधिकाऱ्यांनी घोषणा देत मागणी लावून धरली असता कार्यालयातून जवाबदार अधिकाऱ्यांनी मनधरणीचा प्रयत्न केला व ठिय्या आंदोलन बंद करण्याची विनंती केली.पदाधिकारी आपल्या मागण्यांवर ठाम राहिले, अखेर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मंगळवार ला चर्चा करण्याच्या विनंतीवर मनसे पदाधिकार्यांनी ठिय्या आंदोलन स्थगित केले.
मनसेच्या प्रमुख मागण्या!
१)जिल्हा सर्वोपचार रुग्णालयात रुग्णांना चांगल्या सुविधा मिळाव्यात
२)गैरप्रकार करणारी मनुष्यबळ पुरवठा करणारी कंपनीवर कारवाई करावी
३)शासकीय नोकरीवर असून स्वतंत्र वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या डॉक्टरांवर कारवाई करणे
३)अकोला वैद्यकीय महाविद्यालयातून पॅरा मेडिकल कोर्से करणाऱ्या विद्यार्थ्यांना कंत्राटी सेवेत प्राधान्य द्यावे.
४)स्थानिक पूरवठादारांना प्राधान्य द्यावे.
५)स्मार्ट कंपनी मध्ये DMLT चे उमेदवार क्ष किरण व सोनोग्राफी टेक्नीशियन म्हणून कार्यरत आहेत त्यावर कारवाई करावी.
६)स्मार्ट सर्विसेस कंपनीचा करारनामा देणे.
यावेळी मनसे जिल्हाध्यक्ष पंकज साबळे,उपजिल्हाध्यक्ष सतीश फाले,शहर अध्यक्ष सौरभ भगत,मनविसे जिल्हाध्यक्ष रणजित राठोड,उपशहर अध्यक्ष मुकेश धोंडफळे,शुभम कवोकार,तालुका अध्यक्ष विजय बोचरे,मनविसे तालुकाध्यक्ष सौरभ फाले,अमोल भेंडारकर,संतोष बोर्डे,प्रदीप मस्तुद,निलेश स्वर्गीव,मोहन मते,सतीश खाकरे, शिवप्रताप मेघाडे, हर्षल अंभोरे,नितेश जाधव, सम्यक सावळे आदी मनसैनिक उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे