अकोला : मुख्याध्यापकांच्या कार्यशाळेत शिक्षक मतदार नोंदणीबाबत मार्गदर्शन!
अकोला, 13 ऑक्टोबर (हिं.स.)। अमरावती विभागातील शिक्षक विधानपरिषद निवडणुकीच्या अनुषंगाने मतदार संघाच्‍या दि. 1 नोव्हेंबर 2025 या अर्हता दिनांकावर आधारित मतदार याद्या नव्‍याने तयार करण्‍याचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्या अनुषंगाने माध्यमिक आण
P


अकोला, 13 ऑक्टोबर (हिं.स.)। अमरावती विभागातील शिक्षक विधानपरिषद निवडणुकीच्या अनुषंगाने मतदार संघाच्‍या दि. 1 नोव्हेंबर 2025 या अर्हता दिनांकावर आधारित मतदार याद्या नव्‍याने तयार करण्‍याचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्या अनुषंगाने माध्यमिक आणि त्याहून वरील दर्जाच्या शाळांच्या मुख्याध्यापकांची कार्यशाळा आज नियोजनभवनात घेण्यात आली.

अकोला जिल्ह्यातील सर्व पात्र शिक्षकांनी विहित नमूना-19 मधील अर्ज आवश्यक पुरावे व प्रमाणपत्रांसह दाखल करावेत. यादीचे काम परिपूर्ण होण्यासाठी मुख्याध्यापकांनी योगदान द्यावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले. उपजिल्हा निवडणूक अधिकारी महेश परंडेकर यांनी कार्यशाळेत मार्गदर्शन केले. त्यांनी शिक्षक मतदारसंघासाठीच्या मतदार याद्या नव्याने तयार करण्याबाबत कार्यक्रम व वेळापत्रकाची माहिती सर्वांना दिली.

मतदार नोंदणी अधिनियम 1960 चे कलम 31(3) अन्‍वये जाहीर सूचना दि.30 सप्‍टेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात आली असून, सूचनेची प्रथम पुनर्प्रसिध्‍दी दि.15 ऑक्‍टोबर रोजी होईल. वर्तमानपत्रातील नोटीसीची व्दितीय पुनर्प्रसिध्‍दी दि.25 ऑक्‍टोबर रोजी होईल. नमूना-19 व्‍दारे अर्ज स्‍वीकारण्‍याची शेवटची तारीख 6 नोव्‍हेंबर आहे. हस्‍तलिखिते तयार करणे व प्रारुप मतदार याद्यांची छपाई दि.20 नोव्‍हेंबर रोजी होईल. प्रारुप मतदार याद्यांची प्रसिध्‍दी दि.25 नोव्‍हेंबर होईल.

दावे व हरकती स्‍वीकारण्‍याचा कालावधी दि.25 नोव्‍हेंबर ते दि. 10 डिसेंबर असा आहे. दावे व हरकती निकाली काढणे व पुरवणी यादी तयार करणे, छपाई करणे यासाठी दि.25 डिसेंबर हा दिवस निश्चित आहे. मतदार यादीची अंतिम प्रसिध्‍दी दि.30 डिसेंबर रोजी करण्यात येणार आहे.

मतदार नोंदणी कार्यक्रमासाठी अमरावती विभागीय आयुक्‍त हे मतदार नोंदणी अधिकारी असून अकोला जिल्हाधिकारी हे सहायक मतदार नोंदणी अधिकारी आहेत. त्याचप्रमाणे जिल्हयातील सर्व उप विभागीय अधिकारी हे सहायक मतदार नोंदणी असून जिल्हयातील सर्व तालुक्यांचे तहसीलदार हे पद‌निर्देशित अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहेत. त्‍यांच्या कार्यालयामध्‍ये नमूना-19 मधील अर्ज दि. 6 नोव्‍हेंबरपर्यत सादर करता येतील.

नमूना-19 मधील अर्ज वरील ठिकाणी तसेच मुख्य निवडणूक अधिका-यांच्या संकेतस्थळावर व अकोला जिल्हा प्रशासनाच्या https://akola.gov.in/ या संकेतस्‍थळावर उपलब्‍ध आहेत. सर्व पात्र शिक्षकांच्या नोंदणीसाठी सहकार्य करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.

---------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande