अकोला जिल्हा परिषदेच्या 52 गटांचे आरक्षण जाहीर!
अकोला, 13 ऑक्टोबर (हिं.स.)।अकोला जिल्हा परिषद आणि जिल्ह्यातील पंचायत समित्यांची आरक्षण सोडत काढण्यात आली. जिल्हा परिषदेच्या 52 गटाची सोडत जिल्हाधिकारी वर्षा मीना यांच्या यांच्या अध्यक्षतेखाली काढण्यात आली.. या अनेक जिल्हा परिषद सदस्यांना मोठा धक्का
प


अकोला, 13 ऑक्टोबर (हिं.स.)।अकोला जिल्हा परिषद आणि जिल्ह्यातील पंचायत समित्यांची आरक्षण सोडत काढण्यात आली. जिल्हा परिषदेच्या 52 गटाची सोडत जिल्हाधिकारी वर्षा मीना यांच्या यांच्या अध्यक्षतेखाली काढण्यात आली.. या अनेक जिल्हा परिषद सदस्यांना मोठा धक्का बसलाय. जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण आधीच जाहीर करण्यात आले होते. अकोला जिल्हापरिषदेचे अध्यक्ष पद हे अनुसूचित जमाती महिला जाहीर झाले आहे. या आरक्षण नंतर जिल्हा परिषद गट आणि पंचयात समितीच्या गणाच्या आरक्षणाची प्रतिक्षा इच्छुकांना होती. आरक्षण जाहीर झाले नव्हते त्यामुळे छुप्या पद्धतीने इच्छुकांचा प्रचार सुरू होता. मात्र, आता आरक्षण आपल्या सोयीचे जाहीर व्हावे, यासाठी इच्छुकांनी देव पाण्यात ठेवले आहेत. दरम्यान, आरक्षणाच्या घोषणेनंतर अकोल्यात अनेक दिगग्ज माजी पदाधिकाऱ्यांना मोठा धक्का मानला जात आहे. आता या आरक्षणानंतर खऱ्या अर्थान प्रचाराला जोर येणार आहे.

असे असेल आरक्षण!

अकोला जिल्हा परिषदेचे 52 जागा पैकी 26 जागा महिलांसाठी राखीव..

अनुसूचित जाती १२ जागा पैकी (६ महिला राखीव)

१) निमकर्दा

२)अंदुरा

३) कानडी

४)कानशिवनी

५)शिर्ला

६)दहीहांडा

अनुसूचित जाती सर्वसाधारण

१) लाखपुरी

२) सिरसो

३) शेलु बाजार

४) देगाव

५) उगवा

६) बाबुळगाव

अनुसूचित जमाती ०५ जागा पैकी ३ महिला राखीव

१) अकोलखेड

२)अकोली जहागीर

३)घुसर

अनुसूचित जमाती सर्वसाधारण

१) चोंढि

२) अडगाव बुद्रुक

नागरिकांचा मागास प्रवर्ग १४ जागा पैकी ७ महिला राखीव

१)वरूर जवळा

२)बोरगाव मंजू

३)कान्हेरी सरप

४)राजंदा

५)उमरा

६)मुंडगाव

७)हातगाव

नागरिकांचा मागास प्रवर्ग सर्वसाधारण

१)वाडेगाव

२)कुरणखेड

३)चांदूर

४)सस्ती

५)आगर

६)हातरुण

७) पिंपळखुटा

सर्वसाधारण २१ जागा पैकी १० महिला राखीव

१)दानापूर

२)पिंजर

३)बेलखेड

४)झोडगा

५)चोहटा बाजार

६)माना

७)चिखलगाव

८)वडाळी देशमुख

९)दगडपारवा

१०)आलेगाव

सर्वसाधारण

१) सिरसोली

२) महान

३) जामवसू

४) भांबेरी

५)विवरा

६) दहीगाव

७) कुरुम

८) व्याळा

९) पारस

१०) कुटासा

११) पाथर्डी

---------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande