भाजपच्या प्रवीण दरेकर यांची धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मदत
धाराशिव, 13 ऑक्टोबर (हिं.स.)।भारतीय जनता पक्षातील विधान परिषदेचे गटनेते आमदार प्रवीण दरेकर यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त आज धाराशिव जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त वाघेगव्हाण (ता. परांडा) येथील शेतकऱ्यांची भेट घेऊन या संकटकाळात त्यांना दिलासा दिला. या
अ


धाराशिव, 13 ऑक्टोबर (हिं.स.)।भारतीय जनता पक्षातील विधान परिषदेचे गटनेते आमदार प्रवीण दरेकर यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त आज धाराशिव जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त वाघेगव्हाण (ता. परांडा) येथील शेतकऱ्यांची भेट घेऊन या संकटकाळात त्यांना दिलासा दिला. यावेळी उपस्थित राहून वाघेगव्हाण येथील ग्रामस्थांशी संवाद साधला.

मुंबईहून आपल्या कुटुंबीयांसह धाराशिव जिल्ह्यात येऊन त्यांनी अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी मदतीचा हात पुढे करत सामाजिक बांधिलकीचे उदाहरण दाखवून दिले. या संकटाच्या काळात शेतकरी बांधव एकटे नाहीत, त्यांच्या सोबत राज्य सरकार आणि सरकारमधील प्रत्येक घटक ठामपणे उभा आहे.आपल्या सरकारकडून जाहीर झालेली मदत लवकरच प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यात जमा होईल, गावातील पायाभूत सुविधांच्या कामाच्या प्राधान्यक्रमाबाबत ग्रामसभा घेऊन ठराव करावा. ज्या कुटुंबांचे अतीव नुकसान अतिवृष्टीमुळे झाले आहे त्यांना श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या माध्यमातून क्राउड फंडिंगद्वारे मदत मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत.असे सांगितले यावेळी आ. राणा जगजितसिंह पाटील,श्री. सुजितसिंह ठाकूर, श्री. दत्ताभाऊ कुलकर्णी, श्री.नितीन काळे, श्री.विकास कुलकर्णी यांच्यासह स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते व शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande