अमरावती, 13 ऑक्टोबर (हिं.स.) -
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शक्य आहे, तिथे महायुतीमधील मित्रपक्षांसोबत युती करण्याचे संकेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. ते अमरावतीत बोलत होते.
ते पुढे म्हणाले, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी संपूर्ण महाराष्ट्रात विभागनिहाय आमचे दौरे लावलेत. राज्यात लवकरच महापालिका, जिल्हा परिषद, नगरपालिका, नगरपंचायतीच्या निवडणुका आहेत. या निवडणुकांचा आढावा घेण्यासाठी या बैठका लावण्यात आल्यात. आम्ही यापूर्वी मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, कोकण, पश्चिम महाराष्ट्र या 4 विभागांचा आढावा घेतला. आता अमरावती विभागाचा आढावा घेतला जात आहे. मुंबई विभागाचा आढावा पुढल्या आठवड्यात घेतला जाईल. एकूणच कार्यकर्त्यांची मानसिक तयारी चांगली आहे. निवडणुकीसाठी भाजप पूर्णपणे सज्ज आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी